मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: शंकर
जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपट: संगम, साल:
१९६४, भूमिका: राज
कपूर, वैजयंतीमाला,
राजेंद्र कुमार
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २००७०३१४
धृ
|
मेरे मन
की गंगा और तेरे मन
की जमुना का बोल राधा बोल संगम होगा की नहीं? अरे बोल
राधा बोल संगम होगा की नहीं? नहीं,
कभी नहीं!
|
माझ्या मनची गंगा आणि तुझ्या मनच्या यमुनेचा बोल राधे बोल
संगम होईल की नाही? अगं, बोल राधे बोल संगम होईल की नाही? नाही, मुळीच नाही!
|
१
|
कितनी सदियाँ बीत गईं हैं हाय तुझे समझाने में मेरे जैसा धीरज वाला है कोई
और ज़माने में मन का
बढता बोझ कभी कम
होगा की नहीं बोल राधा बोल संगम होगा की नहीं,
जा जा!
|
शतके इतकी वाहून गेली हाय तुला समजवतांना माझ्यागत कुणी धैर्यधर असा ह्या जगती आहे
का
दुजा ओझे वाढते मनचे कधी कमी होईल की नाही बोल राधे बोल
संगम होईल की नाही? जा जा!
|
२
|
दो नदियों का मेल अगर इतना पावन कहलाता है क्यों न
जहाँ दो दिल मिलते हैं स्वर्ग वहाँ बस जाता है पत्थर पिघले दिले तेरा नम
होगा की नहीं बोल राधा बोल संगम होगा की नहीं,
उँहू!
|
दोन नद्यांचा
संगम जर इतका पावन गणल्या जातो का न जिथे मिळती हृदये दो स्वर्ग तिथे मग
अवतरी तो पाझरतो पत्थरही,
मन तव द्रवेल की
नाही बोल राधे बोल
संगम होईल की नाही? उँहू!
|
३
|
तेरी ख़ातिर मैं तरसा यूँ जैसे धरती सावन को राधा राधा एक रटन है साँस की
आवन जावन को हर मौसम है प्यार का
मौसम होगा की नहीं बोल राधा बोल संगम होगा की नहीं जाओ न
क्यों सताते हो!
होगा, होगा,
होगा!
|
तुझ्यासाठी मी तळमळतो जणू धरती वर्षेसाठी झुरे राधा राधा हाच
ध्यास जणू श्वासाश्वासातून वसे हरऋतू बरवा प्रीतीऋतू असे होईल की
नाही बोल राधे बोल
संगम होईल की नाही? जा ना, का
सतावता! होईल,
होईल, होईल!
|
https://www.youtube.com/watch?v=5kDPTrnvw-U
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.