गीतानुवाद-०८९: आजा पिया तोहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०८९: आजा पिया तोहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१७-०१-०५

गीतानुवाद-०८९: आजा पिया तोहे प्यार दूँ

मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: राहुल देव बर्मन, गायक: लता मंगेशकर
चित्रपट: बहारों के सपने, साल: १९६७, भूमिकाः आशा पारेख, राजेश खन्ना


॥
धृ
॥
आजा पिया तोहे प्यार दूँ
गोरी बैयाँ तोपे वार दूँ
किसलिए तू इतना उदास
सुखें सुखें होंठ, अँखियों में प्यास
किसलिए, किसलिए?

ये रे प्रिया तुला प्रेम घे
गोरे बाहू तुजवर वारू हे
का बर रे तू इतका उदास
शुष्क झाले ओठ, डोळ्यांत तहान
कशाला रे, कशाला रे
॥
१
॥
जल चूके हैं बदन कई
पिया इसी रात में
थके हुए इन हाथों को
दे दे मेरे हाथ में
सुख मेरा ले ले
मैं दुःख तेरे ले लूँ
मैं भी जिऊँ, तू भी जिए

तडपती तने कितीक रे
प्रिया ह्याच राती रे
थकलेल्या ह्या हातांना
दे रे माझ्या हाती रे
सुख माझे घे रे
मी दुःख तुझे घेते
मीही जगते, तूही जगून घे
॥
२
॥
होने दे रे जो ये जुल्मी हैं
पथ तेरे गाँव के
पलकों से चुन डालूंगी मैं
काँटे तेरे पाँव के
लट बिखराए, चुनरिया बिछाए
बैठी हूँ मैं तेरे लिए

असू दे रे तुझ्या गावचे
जुल्मी हे पथ सारे
डोळ्यांनीच वेचेन
तुझ्या पायांतील काटे
बटा विसकटून, पदरा पसरून
मी बसलेली तुझ्यासाठी रे

॥
३
॥
अपनी तो जब अँखियों से
बह चली धार सी
खिल पड़ी वही एक हँसी
पिया तेरे प्यार की
मैं जो नहीं हारी, सजन ज़रा सोचो
किसलिए, किसलिए?

माझ्या ही ह्या जेव्हा डोळ्यांतून
धार ही वाहते रे
तेव्हाची एक हसू
तुझ्या फुटे रे प्रेमाचे
मी का नाही हरले, कर विचार जरासा
कशाला रे, कशाला रे