गीतानुवाद-२४१: जलते हैं जिसके लिए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२४१: जलते हैं जिसके लिए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०३-२४

गीतानुवाद-२४१: जलते हैं जिसके लिए

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः तलत महमूद
चित्रपटः सुजाता, सालः १९५९, भूमिकाः सुनील दत्त, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०९३०


धृ

जलते हैं जिसके लिए
तेरी आँखों के दिए
ढूंढ लाया हूँ वही
गीत मैं तेरे लिए

तुझ्या ह्या नेत्रज्योती
तेवती ज्याच्यासाठी
शोधून आणले आहे
गीत ते तुझ्यासाठी

१

दर्द बन के जो मेरे
दिल में रहा ढल न सका
जादू बन के तेरी आँखों में रुका
चल न सका
आज लाया हूँ वही
गीत मैं तेरे लिए

दुःख होऊन माझ्या,
हृदी राहिले, सुटून न गेले
जादू होऊन नेत्री तुझ्या, राहिले
न ढळता जे
आज आणले आहे
गीत ते तुझ्यासाठी

२

दिल में रख लेना इसे
हाथों से ये छूटे न कहीं
गीत नाज़ुक है मेरा शीशे से भी
टूटे न कहीं
गुनगुनाऊंगा यही
गीत मैं तेरे लिए

मनी जपून हे ठेव, सुटुन
न जावो, हातातून कधी
गीत नाजूक हे, माझे काचेहुनी
तुटो न कधी
गुणगुणत राहीन मी
गीत ते तुझ्यासाठी

३

जब तलक ना ये तेरे
रसके भरे होठों से मिलें
यूँ ही आवारा फिरेगा ये
तेरी ज़ुल्फ़ों के तले
गाए जाऊँगा वही
गीत मैं तेरे लिए

तुझ्या रसरसलेल्या ना
ओठांवर येईल, तोवर
असेच हे भटकत राहील
तुझ्या केसांच्या तळी
गातच राहीन मी
गीत ते तुझ्यासाठी