२०२१-०८-३०

गीतानुवाद-२२८: जीना यहाँ मरना यहाँ

मूळ हिंदी गीतः शैली शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिशन, गायकः मुकेश
चित्रपटः मेरा नाम जोकर, सालः १९७०, भूमिकाः राज कपूर, सिम्मी ग्रेवाल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८३०


धृ

जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज़ दो
हम हैं वहीं हम थे जहाँ
जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ

जगणे इथे मरणे इथे
सोडून हे जायचे कुठे
हवे तेव्हा तू मला आवाज दे
मी आहे तिथेच होतो जिथे
जगणे इथे मरणे इथे
सोडून हे जायचे कुठे

ये मेरा गीत जीवन संगीत
कल भी कोई दोहरायेगा
जग को हँसाने बहरूपिया
रूप बदल फिर आयेगा
स्वर्ग यहीं नर्क यहाँ
इसके सिवा जाना कहाँ

हे माझे गीत जीवन संगीत
उद्यालाही कोणी गाईलही
हसवायला जगाला पुन्हा
बहुरूपी येईल बदलून रूप
स्वर्ग इथे नर्क इथे
सोडून हे जायचे कुठे

कल खेल में हम हों न हों
गर्दिश में तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम, भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
होंगे यहीं अपने निशाँ
इसके सिवा जाना कहाँ 

खेळात उदा नसेनही मी
आकाशी तारे राहतील सदा
विसरशील तू, विसरतील ते
तरीही तुझा मी राहीन सदा
असतील इथे आपल्या खुणा
सोडून हे जायचे कुठे

https://www.youtube.com/watch?v=sI7WLg21i80

२०२१-०८-२९

गीतानुवाद-२२७: मस्तीभरा है समा

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः दत्ताराम वाडकर, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः परवरिश, सालः १९५८, भूमिकाः राज कपूर, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८२९

धृ

मस्ती भरा है समां
हम तुम है दोनों यहां
आँखों में आजा
दिल में समां जा
झूमे जमीं आसमान

मस्ती भरे आज का
दोघेही इथेच आहो ना
डोळ्यांत ये ना
हृदी रहा ना
नाचे जमीन आसमान

नीली आँख मिला लो जी
दिल में आज छुपा लो जी
बाहों में बाहें डाले जी
गिर न जाए संभालो जी
भीगी हवाओ में
ऐसी फिजाओ में
होश मुझे कहाँ

नीळी नजर भिडव ना
हृदयी आत लपव ना
बाहूंचे हार तू घाल ना
पडतो, जरा सांभाळ ना
सर्द हवेमध्ये
अशा बहारीत
शुद्ध कुठे आहे मला

प्यार से प्यार सजाये चल
मनन की प्यास बुझाए चल
प्यार का राग सुनाये चल
दिल का साज बजाये चल
पच्छी भी गाएंगे
सबको सुनायेंगे
तेरी मेरी दास्ताँ

प्रेमाने प्रेम फुलव ना
तहान मनीची भागव ना
प्रेमाचे गीत ऐकव ना
हृदीचे स्पंद वाजव ना
पक्षीही गातील
सर्वा ऐकवतील
तुझीमाझी ही कथा

 

https://www.youtube.com/watch?v=fbXiAJT4Bzs

२०२१-०८-२३

गीतानुवाद-२२६: कुहू कुहू बोले कोयलिया

मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः आधी नारायण राव, गायकः लता, रफी
चित्रपटः सुवर्णसुंदरी, सालः १९५७, भूमिकाः अंजलीदेवी, नागेश्वर राव 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८२३

 

धृ

कुहू कुहू बोले कोयलिया
कुंज-कुंज में भंवरे डोले गुन-गुन बोले

कुहू कुहू गाते कोकीळ का
कुंजी गुंजत भुंगा गुंजे, गुणगुण गुंजे

सोहनी

 

सज सिंगार ऋतु आई बसंती
जैसे नार कोई हो रस्वंती
सां नी ध म ध नी सां, ग म ग म ध नी सां
रें सां नी ध नी, सां रें सां नी, सां रें सां नी
ध नी नी, ध नी नी, ध नी, म ध ध, म ध ध, म ध सा रे ग म ध नी सां
सज सिंगार ऋतु आई बसंती
जैसे नार हो रस्वंती
डाली-डाली कलियों को तितलियाँ चूमें
फूल-फूल पंखड़ियाँ खोलें, अमृत घोलें

सज श्रुंगार ऋतू ये हा वसंती
जणू ही नार कुणी ये रसवंती
सां नी ध म ध नी सां, ग म ग म ध नी सां
रें सां नी ध नी, सां रें सां नी, सां रें सां नी
ध नी नी, ध नी नी, ध नी, म ध ध, म ध ध,
म ध सा रे ग म ध नी सां
सज श्रुंगार ऋतू ये हा वसंती
जणू ही नार कुणी ये रसवंती
फांदीवर का, कळी कळीला, पाखरू चुंबे
फूल फूल पाकळ्या उकलते, अमृत झरते

बहार

सोहनी

काहे घटा में बिजुरी चमके
हो सकता है मेघराज ने
बादरिया का श्याम-श्याम मुख चूम लिया हो
चोरी-चोरी मन पंछी उड़े, नैना जुड़े

का ही वीज मेघांतून चमके
मेघराज, हे होऊही शकते
चुंबत शामल मेघिनीस हो
लपतछपत मन मोर होत, नजरा जुळती  

जौनपुरी
सोहनी
यमन

 

 

चंद्रिका देख छाई, पिया चंद्रिका देख छाई
चंदा से मिलके, मन ही मन में मुस्कायी
छायी, चंद्रिका देख छायी
शरद सुहावन, मधु मनभावन
विरही जनों का सुख सरसावन
छायी-छायी पूनम की घटा, घूंघट हटा
सरस रात मन भाये प्रियतमा
कमल-कमलनी मिले
किरण हार दमके, जल में चाँद चमके
मन सानंद-आनंद डोले रे
ऩी रे ग म ध नी सां, ध नी सां
सां नी सां, गं रें गं सां रें नी सां
ध नी म ध नी सां
नी रें नी रें, ध नी ध नी, म ध म ध,
ग म ग म
ग म ध नी सां, ग म ध नी सां, ध नी सां

चंद्रिका बघ नं आली, प्रिया चंद्रिका बघ नं आली
चंद्रास भेटून, प्रसन्नमन झाली
झाली, प्रसन्नमन झाली
शरद सुखावे, मधु मनभावे
विरही जनांचे सुख सरसावे
आली आली पुनवेची निशा, घुंघट कशा
सरस रात मनसोक्त प्रियतमा
कमळ-कमळीस मिळे
किरणहार चमके, चमके चंद्र जले
मन सानंद-आनंद डोले
ऩी रे ग म ध नी सां, ध नी सां
सां नी सां, गं रें गं सां रें नी सां
ध नी म ध नी सां
नी रें नी रें, ध नी ध नी, म ध म ध,
ग म ग म
ग म ध नी सां, ग म ध नी सां, ध नी सां

https://www.facebook.com/112378120215257/videos/2603654369869286/?extid=SEO----

२०२१-०८-१३

गीतानुवाद-२२५: लिखे जो खत तुझे

मूळ हिंदी गीतः नीरज, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मोहम्मद रफी
चित्रपट: कन्यादान, सालः १९६९, कलाकारः शशी कपूर, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१२०३३०

धृ

लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में
हजारो रंग के, नजारे बन गये
सवेरा जब हुआ, तो फूल बन गये
जो रात आई तो सितारे बन गये

पत्रे जी लिहिली, सयीने तुझ्या ती
हजारो रंगांची दृश्ये ती जाहली
पहाट होतांना फुले ती जाहली
अन्‌ रात होतांना तारे ती जाहली

कोई नगमा कहीं गुंजा
कहाँ दिल में ये तू आई
कही चटकी कली कोई
मैं ये समझा तू शरमाई
कोई खुषबू कहीं बिखरी
लगा ये जुल्फ लहराई

कुठे गुंजे कसे गीत अन्‌
कुठे मनात तू आलीस
कुठे गळली कळी कुठली
मला वाटे तू लाजलीस
कसा दरवळ कुठे विखुरे
असे वाटे बटा लहरे

फिजा रंगीं अदा रंगीं
ये इठलाना ये शरमाना
ये अंगडाई ये तनहाई
ये तरसाकर चले जाना
भला देखा नहीं किस को
जवाँ जादू ये दिवाना

ऋतू रंगीत लकब रंगीत
तुझे वळणे, हे लाजणे
तुझी गिरकी, तुझा विरह
तुझे ते सोडूनी जाणे
कुणाला पाहवे ना ही
युवा जादू खुळावणारी

जहाँ तू हैं वहाँ मैं हूँ
मेरे दिलकी तू धडकन हैं
मुसाफिर मैं तू मंझिल हैं
मैं प्यासा हूँ तू सावन हैं
मेरी दुनिया ये नजरे हैं
मेरी जन्नत ये दामन हैं

जिथे तू अस तिथे मीही
मम हृदीचे स्पंदन तू अस
प्रवासी मी, तू गंतव्यच
मी तहानेला, तू श्रावण अस
माझे जग हे ह्या नजरेतच
माझा स्वर्गही तुझ्या ओटीत

https://www.youtube.com/watch?v=vTQkB6MvKZc

२०२१-०८-१२

गीतानुवाद-२२४: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

मूळ हिंदी गीतः हसरत, संगीतः शंकर जयकिसन, गायकः महंमद रफी
चित्रपटः पगला कहीं का, सालः १९७०, कलाकारः शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन 

मराठी अनुवादः २०२१०७१३

धृ

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
हाँ तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे

तू मला असे न विसरू शकशील
हो, तू मला असे न विसरू शकशील
जेव्हा कधी ऐकशील गीत माझे
माझ्यासोबत तूही गुणगुणू लागशील

वो बहारें वो चांदनी रातें
हमने की थी जो प्यार की बातें
उन नज़ारों की याद आएगी
जब खयालों में मुझको लाओगे

त्या बहारी, त्या चांदण्या रात्री
आपण केलेल्या प्रीतीच्या गोष्टी
त्या दृश्यांची यादही येईल
जेव्हा विचारांत तू मला आणशील

मेरे हाथों में तेरा चेहरा था
जैसे कोई गुलाब होता है
और सहारा लिया था बाहों का
वो समा किस तरह भुलाओगे

माझ्या हातात तुझा चेहरा होता
जणू कुठला गुलाब असतो तसा
आणि आधार हातांचा तुझ्या होता
ती सांज कशी विसरशील तू

मुझको देखे बिना क़रार ना था
एक ऐसा भी दौर गुज़रा है
झूठ मानूँ तो पूछलो दिल से
मैं कहूंगा तो रूठ जाओगे

मला पाहिल्याविना चैन नसे तुजला
एक काळ असाही गेलेला होता
खोटे वाटेल तर मना विचारून पाहा
मी म्हटले, तर तू रुसून जाशील

https://www.youtube.com/watch?v=Mkxh3xLkhMk

२०२१-०८-११

गीतानुवाद-२२३: तुम से इज़हार-ए-हाल कर बैठे

मूळ हिंदी गीतकारः शकील, संगीतः नौशाद, गायकः रफी
चित्रपटः मेरे मेहबूब, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्र कुमार, साधना, अमिता, अशोककुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००१०९

प्रस्ताव

आज फ़ुरकत का ख्वाब टूट गया
मिल गये तुम हिजाब टूट गया

विरहातील हे स्वप्न आज भंगले
भेटलीस तू, पडदेही सर्व संपले

धृ

तुम से इज़हार-ए-हाल कर बैठे
बेखुदी में कमाल कर बैठे

मनावस्था मी तुला कबूल केली
बेहोशीतच कमाल जणू केली

खो गये हुस्न की बहारों में
कह दिया राज़-ए-दिल इशारों में
काम हम बेमिसाल कर बैठे

हरवलो मी सौंदर्य बहरांतच
गूज सांगितले माझे इशार्‍यात
अनुपमेय मी ही कृती केली

कितने मजबूर हो गये दिल से
सोचे समझे बगैर क़ातिल से
ज़िन्दगी का सवाल कर बैठे

किती असहाय्य झालो मी मनाने
न विचार करताच, रूपगर्वितेला
प्रश्न आयुष्याचा कशास केला

ये अदाएं ये शोखियां तौबा
बस खुदा ही खुदा है उस दिल का
जो तुम्हारा खयाल कर बैठे

या लकबी हे नखर्‍यांचे कहर
फक्त ईश्वरच आधार त्या मनाला
जो विचार तुझाच करू पाहे

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=CGE1RUmHjRM

२०२१-०८-१०

गीतानुवाद-२२२: लग जा गले

मूळ हिंदी गीतकारः राजा मेहंदी अली खान, संगीतः मदनमोहन, गायीकाः लता
चित्रपटः वह कौन थी, सालः १९६३, भूमिकाः मनोजकुमार, साधना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८१५

धृ

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

जवळी मला धरी ही रात्र ये न ये पुन्हा
बहुधा न होऊ दे या जन्मी भेटही पुन्हा

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो

हाती मिळाली आज ही घटिका सुदैवाने
जवळून घे बघून मनसोक्त तू सुखे
मग आपल्या नशीबी हे सुख ये न ये पुन्हा

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार
आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

ये जवळ न मी पुन्हा येणार वारंवार
घालुन गळा गळ्यात रडू आज धायधाय
डोळ्यांतूनी हे प्रेम बरसो न वा पुन्हा

 https://www.youtube.com/watch?v=TFr6G5zveS8

२०२१-०८-०९

गीतानुवाद-२२१: ओ सनम तेरे हो गए हम

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतकारः शंकर जयकिसन, गायकः रफी, लता
चित्रपटः आयी मिलन की बेला, सालः १९६४, भूमिकाः राजेंद्रकुमार, सायरा बानू 

नरेंद्र गोळे २०१२०७२१


धृ
ओ सनम तेरे हो गए हम
प्यार में तेरे खो गए हम
ज़िन्दगी को ऐ हमदम
आ गया मुसकुराना
साजणा तुझी झाले रे मी
प्रेमातच तुझ्या हरपले मी
जीवनाला रे सजणा
आले सुस्मित करणे
 
ओ सनम तेरे हो गए हम
प्यार में तेरे खो गए हम
मिल गया मुझको ऐ सनम
ज़िन्दगी का बहाना
साजणे तुझा झालो ग मी
प्रेमातच तुझ्या हरवलो मी
गवसला मला सजणे
आशयच जीवनाचा
दो भटकते राही आ मिले मंज़िल पर
दो पथिक येऊनी भेटले ईप्सितावर
 
दो दिलों की कश्ती आ लगी साहिल पर
दोन मनांची नौका लागली की तीरावर
 
मुस्कुराते जाएँ इक संग दो मुक़द्दर
सोबतच विधिलिखिते सुखानेच आक्रमू चल
रात चुप सुनती है ये हँसी अफ़साना
रात्र मुकाट ऐके सरस आपली कहाणी
 
देखते हैं तारे बस गया वीराना
उजाड रान वसतांना तारेही हे पाहती
 
चाँद को शरमा दे आपका शरमाना
चंद्राला लाजवे बघ लाजणे हे तुझे ग
सूनेपन में अचानक कोई पंछी बोला
शांततेतच पक्षी कोणी बोले अचानक
 
जाग कर सपने से दिल किसी का डोला
स्वप्नातून जागत कुणाचे डोलते रे हे मन
 
रात की रानी का किसने घूँघट खोला
रातीच्या राणीचा या उचलला कोणी घुंघट


https://www.youtube.com/watch?v=Q7bbhcK3VN8

२०२१-०८-०७

गीतानुवाद-२२०: ऐ मेरे प्यारे वतन

मूळ हिंदी गीतः प्रेम धवन, संगीतः सलील चौधरी, गायकः मन्ना डे
चित्रपटः काबुलीवाला, सालः १९६१, भूमिकाः बलराज सहानी, उषा किरण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८०७

 

धृ

ऐ मेरे प्यारे वतन
ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुर्बान
 ही मेरी आरजू
तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान

आवडत्या स्वदेशा तू
ए विलगलेल्या फुला

तुजसी अर्पण प्राण
तूच आवडही माझी
तू प्रतिष्ठाही माझी
तूच माझा प्राण

तेरे दामन से जो आये
 उन हवाओं को सलाम

चूम लूँ मैं उस ज़ुबां को
जिसपे आये तेरा नाम
सब से प्यारी सुबह तेरी
सब से रंगीं तेरी शाम

स्वदेशावरूनी जी हवा ये
त्या हवेलाही प्रणाम

चुंबू वाणी जीवरी ये
रे स्वदेशाचेच नाव
सकाला सर्वोत्तम तुझी
सर्वात रंगीत 
तुझीच सांज

माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू

और कभी नन्ही सी बेटी
बनके याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू

आईचे काळीज बनून कधी
छातीला तू स्पर्शसी

आणि कधी छोटीशी मुलगी
होऊनी आठवशी तू
जेवढा आठवशी तू 
तितकाच तळमळवसी तू

छोड़कर तेरी ज़मीन को
दूर आ पहुचे हैं हम

फिर भी है यही तमन्ना
तेरे जर्रों की कसम
हम जहाँ पैदा हुये उस
जगह ही निकले दम

सोडूनी भूमी तुझी मी
खूप दूर आलो आहे

तरीही माझी हीच इच्छा
तव धुळीची रे शपथ
जन्मलो मी जेथ तेथे
प्राण जावो रे खरच

https://www.youtube.com/watch?v=jDdlOoysg4s

गीतानुवाद-२१९: अफ़साना लिख रही हूँ

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः नौशाद, गायिकाः उमादेवी
चित्रपटः दर्द, सालः १९४७, भूमिकाः सुरैय्या, मुनव्वर सुलतान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१३१२१८



धृ

अफ़साना लिख रही हूँ अफ़साना लिख रही हूँ
दिल-ए-बेक़रार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ

स्वगतच लिहिते आहे स्वगतच लिहिते आहे
या अस्वस्थ मनाचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे
स्वगतच लिहिते आहे



जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में
नहीं है बहार में
जी चाहता है मूँह भी
जी चाहता है मूँह भी न देखूँ बहार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

तू नसता ही निरस, असे बहार सर्वही
असे बहार सर्वही
वाटे मला मी पाहू ना
वाटे मला मी पाहू ना  मुख या बहारीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे



हासिल हैं यूँ तो मुझको ज़माने की दौलतें
ज़माने की दौलतें
लेकिन नसीब लाई
लेकिन नसीब लाई हूँ इक सोग़वार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

हाताशी आहे सर्व जगाची ही संपदा
जगाची ही संपदा
नशीब घेतले मात्र
नशीब घेतले मात्र शोकाकूल व्यक्तीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे



आजा कि अब तो आँख में आँसू भी आ गये
आँसू भी आ गये
साग़र छलक उठा
साग़र छलक उठा मेरे सब्र-ओ-क़रार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

आता तरी तू ये, आले अश्रूही दाटूनी
आले अश्रूही दाटूनी
बुरूज ढळू पाहती
बुरूज ढळू पाहती माझ्या धैर्यशक्तीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे


https://www.youtube.com/watch?v=D7XJy4bSNRY

२०२१-०८-०१

गीतानुवाद-२१८: ऐ मालिक तेरे बंदे हम

मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायकः मन्ना डे लता
चित्रपटः दो आँखे बारा हात, सालः १९५७, भूमिकाः व्ही. शांताराम, संध्या 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९०६

धृ

ऐ मालिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चलें
और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम

ए स्वामी सेवक तव आम्ही
करू कामे अशी नेहमी
नेकीने चलू
वाईटा दूर करू
ज्याने हसतच जाईल प्राणही

बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमीं
पर तू जो खड़ा
है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमे जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म

आहे असमर्थ मानव किती
ह्यात लाखो उणीवा तरी
पण तू जो उभा
आहेस दयाळू खरा
तुझ्या कृपेवरती स्थिर ही जमीन
जन्म तू आहेस आम्हाला दिला
तूच हरशील ही दुःखे सदा

ये अंधेरा घना छा रहा
तेरा इनसान घबरा रहा
हो रहा बेखबर
कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में वो दम
जो अमावस को कर दे पुनम

अंधार हा गडद होत आहे
तुझा माणूस घाबरत आहे
होत तो बेखबर
ये न काही नजर
सौख्यसूर्यही लपू लागला
आहे दीप्तीमध्ये तव जो दम
अमावस्येला करतो पुनव

जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें
हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम

जेव्हा जुलुमांचा हो सामना
तेव्हा तू हात धर आमचा
ते करोत वाईटही
जे भले तेच करू
न हो सूडाची कधी कामना
पाऊल प्रेमाचे हर हो पुढे
आणि वैराचे भ्रम संपू दे

 

https://www.youtube.com/watch?v=fFc9TMxRbQg