गीतानुवाद-२३४: हे... निले गगन के तले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२३४: हे... निले गगन के तले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-१२-०१

गीतानुवाद-२३४: हे... निले गगन के तले

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायकः महेंद्र कपूर
चित्रपटः हमराज, सालः १९६७, भूमिकाः राजकुमार, सुनील दत्त, विम्मी, मुमताज 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११३०

 

धृ

हे... नीले गगन के तले
धरती का प्यार पले
ऐसे ही जग में
आती हैं सुबहें
ऐसे ही शाम ढले

हे... निळ्या नभाच्या तळी
धरतीचे प्रेम फुले
अशीच जगती
येते पहाट
अशीच सांज ढळे

१

शबनम के मोती
फूलों पे बिखरे
दोनों की आस फले

दवाचे मोती
फुलांवर तरती
दोघांची आशा फळे

२

बलखाती बेलें
मस्ती में खेलें
पेड़ों से मिलके गले

वळत्या या वेली
मस्तीत विहरती
वृक्षांना घेऊन कवेत

३

नदिया का पानी
दरिया से मिलके
सागर की ओर चले

नदीचे पाणी
होऊन दरिया
सागराकडे चालते