गीतानुवाद-३०६: मचलती हुई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-३०६: मचलती हुई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२४-१२-३१

गीतानुवाद-३०६: मचलती हुई हवा में छम छम

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः चित्रगुप्त, गायकः किशोर, लता
चित्रपटः गंगा की लहरें, सालः १९६४, भूमिकाः किशोरकुमार, धर्मेंद्र, अरुणा इराणी, सावित्री

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२३१


धृ

आ आ आ, आ आ

ल

आ आ आ, आ आ

 

ओ हो हो, हो हो

मचलती हुई, हवा में छम छम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

कि

ओ हो हो, हो हो

उसळती अशा, हवेत छम छम
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

 

ओ, ज़माने से कहो, अकेले नहीं हम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

ल

ओ, जगाला हे म्हणा, एकटे ना आम्ही
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

 

मचलती हुई, हवा में छम छम
हमारे संग संग चलें गंगा की लहरें
ज़माने से कहो, अकेले नहीं हम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

कोरस

उसळती अशा, हवेत छम छम
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी
ओ, जगाला हे म्हणा, एकटे ना आम्ही
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

१

हरियाली सी, छा जाती है
छाँव में इन के आँचल की

कि

हिरवळ सगळी, पसरत जाते
गंगेच्या पदरात इथे

 

सर को झुका के, नाम लो इन के
ये तो है शक्ती निरबल की
हिमालय ने भी चूमे हैं
इन के क़दम

ल

नम्र होऊनी, नाव हिचे घ्या
ही तर दुर्बळाचीही शक्ती
हिमालयाने सदा स्पर्शिले
हिचेच चरण

२

सुख में डूबा, तन मन उस का
आया जो इन के, आँगन में

ल

सुखात भिजले, तन मन त्याचे
आला हिच्या या, अंगणी जो

 

प्यार का पहला दर्पन देखा
दुनिया ने इन के दर्शन में
के यूँ ही नहीं खाते हम
इन की क़सम

कि

प्रेमाचा पहिला आरसा पाहते
हिच्याच जळी जग सारेची
उगाच नाही घेत शपथ आम्ही
प्रत्यही हिच्या चरणांची

३

साथ दिया है, इन लहरों ने
जब सब ने मुँह फेर लिया

कि

साथ दिली आहे या लहरींनी
कुणी न सोबत केली तवा

 

और कभी जब, ग़म की जलती
धूप ने हम को घेर लिया
तो आओ इन के ही क़दमों
में झुक जाएं हम

ल

आणि कधी जव, दुःख कोसळे
आम्हाला जणू घेरुनीही
तेव्हा या मग हिच्याच चरणी
होऊ आम्ही नतमस्तक