गीतानुवाद-३२३: दिल की आवाज़ भी सुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-३२३: दिल की आवाज़ भी सुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२६-०५-३०

गीतानुवाद-३२३: दिल की आवाज़ भी सुन

 

मूळ हिंदी गीतः शिवान रिझवी, संगीतः ओमप्रकाश नय्यर, गायकः रफी, लता
चित्रपटः हमसाया, सालः १९६८, भूमिकाः जॉय मुखर्जी, माला सिन्हा, शर्मिला टागोर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०५३०


धृ

दिल की आवाज़ भी सुन
मेरे फ़साने पे न जा
मेरी नज़रों की तरफ़ देख
ज़माने पे न जा

मनचे तू म्हणणे ऐक
माझ्या न फसवण्यावर जा
माझ्या डोळ्यांत पहा
लोकांच्या सांगण्यावर न जा

इक नज़र देख ले
जीने की इजाज़त दे दे
रूठने वाले वो
पहली सी मुहब्बत दे दे
इश्क़ मासूम है
इलज़ाम लगाने पे न जा

एक कटाक्ष टाक
जगण्याची परवानगी दे
रुसणारे तू मला
पहिलेसे ते प्रेमहि दे
प्रेम निरागस आहे
आरोप न करण्यावर जा

वक़्त इंसान पे
ऐसा भी कभी आता है
राह में छोड़के
साया भी चला जाता है
दिन भी निकलेगा कभी
रात के आने पे न जा

वेळ माणसावर
कधीतरी अशीही येते
वाटेतच सोडुनी
सावलीही निघुन जाते
दिवसही उगवेल
रात्रीच्या न येण्यावर जा

मैं हक़ीक़त हूँ
ये इक रोज़ दिखाऊँगा तुझे
बेगुनाही पे मुहब्बत की
रुलाऊँगा तुझे
दाग दिल के नहीं मिटते हैं
मिटाने पे न जा

मीच वास्तव आहे
हे एक दिस दावेन तुला
निरपराधित्वावर प्रीतीच्या
रडवेन तुला
डाग मनावरचे न मिटती
मिटवण्यावर न जा