मूळ हिंदी गीतः
साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायक: महेन्द्र कपूर
चित्रपटः गुमराह,
सालः १९६३, कलाकारः अशोककुमार, माला सिन्हा
मराठी अनुवादः
नरेंद्र गोळे २०१८०४२३
प्र स्ता व
|
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो
|
चला पुन्हा एकदा आपण अनोळखी होऊ या दोघे
|
॥ धृ ॥
|
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये मेरी बातों से न ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
|
अपेक्षा ना मी ठेवावी सांत्वनाची तुजकडूनी नको माझ्याकडे पाहूस तू संभ्रमी कटाक्षांनी न माझी स्पंदने लय सोडू दे माझ्याच शब्दांनी न उघड हो गुपित तव द्वंद्वाचे नजरांतून
|
॥ १ ॥
|
तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माझी की तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साये हैं
|
तुलाही काही अडचणी रोखती व्यक्त होण्यातून मलाही लोक म्हणती ऐट ही, भासते परकी माझ्या सोबतीस बदनामी आहे माझ्या सहचराची तुझ्यासोबतही गतरात्रींच्या सावल्या असती
|
॥
२
॥
|
तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
|
ओळखच रोग झाली तर तिला विसरणे उत्तम संबंध जर अवजड झाले तर ते तोडणे चांगले कहाणी जी परिणतीस आणणे शक्य ना होई तिला एका देखण्या वळणावरच सोडणे चांगले
|
तार्रुफ़ = ओळख, ताल्लुक
= संबंध, उलझन = अडचण,
दिलनवाजी = सांत्वना, धीर; कश्म-कश = द्वंद्व
पेशकदमी =
पुढाकार, रुसवाईयाँ = बदनामी
https://www.youtube.com/watch?v=wzbO1mjFPOM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.