भाषिक गुलामीची परमावधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाषिक गुलामीची परमावधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०२-२८

भाषिक गुलामीची परमावधी

मराठी अनुवाद करणे हे तर रोजचे घावन घाटलं. मात्र ह्याचा अनुवाद करावा लागेल असे स्वप्नातही ना वाटलं!


ऐक माझ्या सोन्या बाळा, केव्हाच झाली सकाळ
निर्वाणीची सुचना आता, अंथरुणातून उगव

छानपैकी दात घास, चमकव तुझे दात
हसण्यावारी नेऊ नकोस, हितच आहे त्यात

गरमगरम दूध केलंय, घालून हळद साखर
हाताने तू विटा फोडशील, हे प्यायलास तर

एक पेला दोनदा प्यायलास, तर जीवनसत्त्व भरपूर
होशील धोनी तूही आणि मग धावांना येईल पूर

गणिताच्या गुरूजींना विचार सार्या शंका
मधल्या सुट्टीत पाठ कर मराठीच्या कविता

शाळा सुटल्यावर संध्याकाळी घरी ये लवकर
येता येता वाटेतच पाठ कर वाक्प्रचार

आजोबांच्या वाढदिवसाचे रात्री आहे जेवण
अशा भवतालातच होते मुलांचे संगोपन

मराठीची शिकवणीही लावू तुला खास
दैनिकांत शोधलं खूप पण लागला नाही माग

मूळ कवीः मुरारी देशपांडे ९८२२०८२४९७

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००२२८