गीतानुवाद-०४८: प्रिये प्राणेश्वरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०४८: प्रिये प्राणेश्वरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०६-१८

गीतानुवाद-०४८: प्रिये प्राणेश्वरी

मूळ हिंदी गीत: वर्मा मलिक, संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: किशोरकुमार
चित्रपट: हम तुम और वो, साल: १९७१, भूमिका: विनोद खन्ना, भारती
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०५२२

॥
धृ
॥
प्रिये प्राणेश्वरी, हृदयेश्वरी
यदी आप हमे आदेश करे
तो प्रेम का हम श्रीगणेश करे
प्रिये प्राणेश्वरी, हृदयेश्वरी
जर तू आज्ञा मजसी देशी
मी प्रेमारंभ करेन खचित 

॥
१
॥
ये चक्षू तेरे चंचल चंचल
ये कुंतल भी शामल शामल
ये अधर धरे जीवनज्वाला
ये रूपचंद्र शीतल शीतल
ओ कामिनी प्रेमविशेष करे
हे चक्षू तुझे चंचल, चंचल
हे कुंतलही शामल, शामल
हे अधर धरती जीवनज्वाला
हे रूप चांद्र, शीतल, शीतल
तू कामिनी, प्रेम विशेष करी

॥
२
॥
हो संचित पुण्यों की आशा
सुन व्यथित हृदय की मृदू भाषा
सर्वस्व समर्पण कर दे हम
करो पूर्ण हमारी अभिलाषा
गजगामिनी दूर हर क्लेष करे
संचित पुण्यांची असो आशा
श्रव, व्यथित हृदिची मृदू भाषा
सर्वस्व तुला करतो अर्पण
कर पूर्ण तू माझी अभिलाषा
गजगामिनी दूर हर क्लेष करी

॥
३
॥
हम भ्रमर नहीं इस यौवन के
हम याचक हैं मन उपवन के
हम भावपुष्प कर दे अर्पण
साकार करो सपने मन के
मन मोहिनी मन में प्रवेश करे
मी भ्रमर नसे तारुण्याचा
मी याचक असे मन उपवनीचा
मी भावपुष्प करी तुज अर्पण
साकार करी स्वप्ने मनीची
मन मोहिनी कर तू प्रवेश मनी