२०२०-०९-०३

गीतानुवाद-१५४: हम तो तेरे आशिक हैं

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायकः मुकेश, लता मंगेशकर
चित्रपटः फर्ज, सालः १९६७, भूमिकाः जितेंद्र, बबिता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००८२५


धृ

हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने
चाहे तू माने, चाहे माने
हम भी ज़माने से हैं तेरे दीवाने
चाहे तू माने, चाहे माने

मी तर तुझा नादखुळा शतकानुशतके
मान हे हवे तर, मानसी तरिही
मी ही कधीचीच खुळी आहे तुझ्यावर
मान हे हवे तर, मानसी तरिही



आई हैं यूँ प्यार से जवानियाँ
अरमां दिल में है
दिल मुश्किल में है, जान--तमन्ना
तेरे इसी प्यार की कहानियाँ
हर महफ़िल में हैं
सबके दिल में हैं जान--तमन्ना
छेड़ते हैं सब मुझको अपने-बेगाने

आली असे प्रीतीने तरुणता
मनीषा मनात आहे
मन संकटात आहे, माझे सये
तुझ्या ह्या प्रीतीच्या कहाण्य़ा
सर्व स्थळांत आहेत
सर्व मनांत आहेत माझ्या सख्या रे
चिडवती मला सगळे, आपले नी परके



सोचो मोहब्बत में कभी हाथ से
दामन छूटे तो, दो दिल रूठे तो
तो फिर क्या हो
ऐसा हो काश कभी प्यार में
वादे टूटे तो, दो दिल रूठे तो
तो फिर क्या हो
हम तो चले आएं सनम तुझको मनाने

समज हातातून कधी प्रीतीत
सुटला जर हात तर, मने जर रुसली तर
तर काय होईल
प्रीतीत असे होवो कधी
शपथा तुटल्या तर, मने जर रुसली तर
तर काय होईल
मी तर इथे आलो आहे रुसवा काढायला



मस्त निगाहों से इस दिल को
मस्त बनाए जा, और पिलाए जा
प्यार के सागर
दिल पे बड़े शौक से सितमगर
ठेस लगाए जा, तीर चलाये जा
याद रहे पर
तीर कभी बन जाते हैं खुद निशाने

मस्त नयनांनी ह्या मनाला
मस्त करत जा आणि पाजत जा
प्रेमाचे प्याले
मनावर मोठ्या हौसेने कठोरा
घाव करत जा बाण मारत जा
लक्षात हे ठेव पण
बाण कधी होतात लक्ष्ये स्वतःच

 

https://www.youtube.com/watch?v=sIsleLQJ2N4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.