गीतानुवाद-२५०: चंदन सा बदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२५०: चंदन सा बदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०८-२०

गीतानुवाद-२५०: चंदन सा बदन

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायकः मुकेश, लता
चित्रपटः सरस्वतीचंद्र, सालः १९६८, भूमिकाः नूतन, मनीष 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०६०५

धृ

चंदन सा बदन, चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष ना देना जगवालों
हो जाऊ अगर मैं दीवाना

चंदन तव तन, चंचल ते नयन,
हळुवार तुझे ते स्मित सजणे
मज दोष न द्या जगवाल्यांनो
झालो मी खुळा जर पाहून हे

१

ये काम कमान भवे तेरी
पलकों के किनारे कजरारे
माथेपर सिंदूरी सूरज
होठों पे दहकते अंगारे
साया भी जो तेरा पड़ जाए
आबाद हो दिल का विराना

ह्या मदनधनूगत तव भुवया
पापण्यांच्या कडा काजळकाळ्या
कुंकुमरवी भाळी विलसतसे
अंगार अधरांवर धगधगतो
छायाही तुझी पडता वरती
विराणी मनातील मोहरतील

२

तन भी सुन्दर, मन भी सुन्दर
तू सुन्दरता की मूरत है
किसी और को शायद कम होगी
मुझे तेरी बहोत जरुरत है
पहले भी बहोत मैं तरसा हूँ
तू और ना मुझ को तरसाना

तनही सुंदर मनही सुंदर
तू सुंदरतेची ग प्रतिमा
इतर कुणा न असे तितकी
मज जरूर तुझी खूपच आहे
मी आधीही खुप झुरलो आहे
तू आणखी नको झुरवू मजला