गीतानुवाद-०४५: वो जब याद आए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०४५: वो जब याद आए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०६-११

गीतानुवाद-०४५: वो जब याद आए



मूळ हिंदी गीतकार: फरुक कैसर, संगीत: लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक: लता, रफी
चित्रपट: पारसमणी, साल: १९६३, भूमिका: महिपाल, गितांजली

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००४०६०४

॥
धृ
॥
रफी
वो जब याद आए, बहोत याद आए
गम ए जिंदगी के, अंधेरे मे हमने
चिराग ए मुहब्बत, जलाए बुझाए
वो जब याद आए, बहोत याद आए
रफी
ते जसे याद आले, परत याद आले
दु:खी जीवनाच्या, अंधारामध्ये मी
दिवे प्रेमभावाचे, उजळले मालवले
ते जसे याद आले, परत याद आले

॥
१
॥
रफी
आहटे जाग उठी, रास्ते हँस दिये
थामकर दिल उठे, हम किसी के लिये
कई बार ऐसा भी, धोखा हुआ है
चले आ रहे वो, नजरे झुकाए
रफी
साद जागे झाले, मार्ग हसू लागले
प्राण घेऊन मुठीत, कुणास्तव पाहिले
कितीदा तरी धोका झाला असाही
मान खाली करून, ती येती झाली

॥
२
॥
लता
दिल सुलगने लगा, अश्क बहने लगे
जाने क्या क्या हमे, लोग कहने लगे
मगर रोते रोते हँसी आ गई है
खयालों में आके वो जब मुस्कुराए
लता
काळिज कुढू लागले, अश्रू गळू लागले
लोक काही बाही, आम्हा म्हणू लागले
तरीही रडता रडता, बघ हसू उमटले हे
जेंव्हा विचारात त्याचे, स्मित ते प्रकटले

॥
३
॥
रफी
वो जुदा क्या हुए, जिंदगी खो गई
लता
शम्मा जलती रही, रोशनी खो गई
रफी
बहुत कोशिशे की, मगर दिल न बहला
कई साज छेडे, कई गीत गाए
रफी
दूर होताची ती, जैसे प्राण हरपले
लता
वात पेटत होती, दीप्ती ना राहिली
रफी
यत्न केले अनेक, मन न मुळी मानले
साज किती लावले, गाणी किती गाईली