गीतानुवाद-३०४: ख़यालों में किसी के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-३०४: ख़यालों में किसी के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२४-१२-२९

गीतानुवाद-३०४: ख़यालों में किसी के

मूळ हिंदी गीतः केदार शर्मा, संगीतः रोशन, गायकः गीता दत्त, मुकेश
चित्रपटः बावरे नैन, सालः १९५०, भूमिकाः राज कपूर, गीता दत्त 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१८


धृ

ख़यालों में किसी के
इस तरह आया नहीं करते
किसी को बेवफ़ा आ आ के
तड़पाया नहीं करते
दिलों को रौंद कर दिल अपना
बहलाया नहीं करते
जो ठुकराए गए हों उनको
ठुकराया नहीं करते

गीता:



मुकेश:

विचारांतही कुणाच्या
असे येऊ नये कोणी
कृतघ्ने येऊ येऊनी
तळमळवू नये कोणी
हृदये तुडवून इतरांची
मन न रमवावे कधी कोणी
जे ठोकरले आहेत आधीच
तयांना ठोकरू नये कोणी

हँसी फूलों की दो दिन
चाँदनी भी चार दिन की है
मिली हो चाँद सी सूरत
तो इतराया नहीं करते
जिन्हें मिटना हो वो
मिटने से डर जाया नहीं करते
मुहब्बत करने वाले
ग़म से घबराया नहीं करते

गीता:



गीता:

सुंदर फुलांची ऐट दो दिसांची
चांदणेही चारच दिवसांचे
मिळाले चंद्रमुख तरीही
एवढे शेफारू नये कोणी
ज्यांना संपायचे आहे ते
तयाने घाबरत नाहीत
दुःखाला प्रेम करणारे
मुळिही घाबरत नाहीत

मुहब्बत का सबक सीखो
ये जाकर जलनेवालों से
के दिल की बात भी लब तक
कभी लाया नहीं करते

मुकेश:

प्रेमाचा पाठ हा घ्यावा
जळत्यांकडेच जाऊनी
मनातील गोष्टही कधीही
मुखी आणू नये कोणी