मूळ हिंदी गीतकारः शकील, संगीतः नौशाद, गायकः लता, रफ़ी
चित्रपटः लीडर, सालः १९६४, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६१५
धृ
|
रफ़ी: तेरे हुस्न की क्या तारीफ़ करूँ कुछ कहते हुए भी डरता हूँ कहीं भूल से तू ना समझ बैठे की मैं तुझसे मोहब्बत करता हूँ
|
रफ़ी: तुझ्या रूपाची काय स्तुती मी करू तुला सांगायलाही मी घाबरतो चुकीने असे तू न समजावे की मी प्रेम तुझ्यावरती करतो
|
|
लता: मेरे दिल में कसक सी होती है तेरे राह से जब मैं गुज़रती हूँ इस बात से ये ना समझ लेना की मैं तुझसे मोहब्बत करती हूँ
|
लता: माझ्या हृदयी कसकसे होते रे तुझ्या रस्त्यावरून जेव्हा जाते यावरून असे तू न समजावे की मी प्रेम तुझ्यावरती करते
|
१
|
रफ़ी: तेरी बात मे गीतों की सरगम तेरी चाल मे पायल की छम छम कोई देख ले तुझको एक नजर मर जाएं तेरी आँखों कसम मैं भी हूँ अजब इक दीवाना मरता हूँ ना आहें भरता हूँ
|
रफ़ीः तुझ्या बोलांत गीतांची सरगम तुझ्या चालीत पैंजण छुमछुमती कुणी दृष्टी तुज्यावर टाकील जर होईल खलास तुझ्या डोळ्यांशपथ मी ही अजब एक आहे खुळा मरतो ना, उसासे टाकतो मी
|
२
|
लता: मेरे सामने जब तू आता है जी धक से मेरा हो जाता है लेती है तमन्ना अंगड़ायी दिल जाने कहाँ खो जाता है महसूस ये होता है मुझको जैसे मैं तेरा दम भरती हूँ
|
लताः जसा माझ्यापुढे येशी कधी तू माझे मन हरखे, तन लागे स्फ़ुरू अभिलाषा घेई उसळी वरती मन जाते कुठे, न कळे हरपून मज भासतसे प्रत्यही जणू की तुझे श्वासच घेत असे जणू मी
|
https://www.youtube.com/watch?v=QHoXKcNNSK8
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.