गीतानुवाद-२३८: तुम मुझे भूल भी जाओ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२३८: तुम मुझे भूल भी जाओ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०३-१७

गीतानुवाद-२३८: तुम मुझे भूल भी जाओ

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सुधा मल्होत्रा, गायक: मुकेश, सुधा मल्होत्रा
चित्रपट: दिदी, सालः १९५९, भूमिकाः सुनील दत्त, जयश्री

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०३१७


धृ 
सुधा:

तुम मुझे भूल भी जाओ
तो ये हक़ है तुमको
मेरी बात और है
मैंने तो मुहब्बत की है

विसरलास मला तू तर
तो अधिकार आहे तुला
गोष्ट माझी वेगळी आहे
मी तर प्रेम केले आहे

सुधा:

मेरे दिल की मेरे जज़बात की
कीमत क्या है
उलझे-उलझे से ख्यालात की
कीमत क्या है
मैंने क्यूं प्यार किया
तुमने न क्यूं प्यार किया
इन परेशान सवालात कि
कीमत क्या है
तुम जो ये भी न बताओ
तो ये हक़ है तुमको

माझ्या मनाची, भावनांचीही
किंमत काय आहे
उलट्यासुलट्या या विचारांची
किंमत काय आहे
प्रेम मी का केले
का तू ते नाही केले
या अतित्रस्त सवालांची
किंमत काय आहे
हेही ना सांगसी तू
तोही अधिकार तुझा

१ 
मुकेश:

ज़िन्दगी सिर्फ़ मुहब्बत नहीं
कुछ और भी है
ज़ुल्फ़-ओ-रुख़सार की जन्नत नहीं
कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई
इस दुनिया में
इश्क़ ही एक हक़ीकत नहीं
कुछ और भी है
तुम अगर आँख चुराओ
तो ये हक़ है तुमको
मैंने तुमसे ही नहीं
सबसे मुहब्बत की है

जीवन फक्त प्रेम नाही
आणखीही आहे
रूपकुंतलांचा स्वर्गच नाही
आणखीही आहे
भूकतहानेने व्याकुळलेल्या
या संसारी
प्रेम एकच नाही सत्य
आणखीही आहे
तुला ते बघायचे नसेल तर
अधिकार आहे तुला
मी तुझ्यावरच नाही
सर्वांवर प्रेम केले आहे

२
सुधा:

तुमको दुनिया के ग़म-ओ-दर्द से
फ़ुरसत ना सही
सबसे उलफ़त सही
मुझसे ही मुहब्बत ना सही
मैं तुम्हारी हूँ
यही मेरे लिये क्या कम है
तुम मेरे होके रहो
ये मेरी क़िस्मत ना सही
और भी दिल को जलाओ
तो ये हक़ है तुमको

तुला दुनियेच्या दुःखांतून
फुरसत नसो नसली तरी
सर्वांवर प्रेम असो
मजवर नसो नसले तरी
मी तुझी आहे
हे माझ्यासाठी काय कमी आहे
तू माझा होऊन रहावे
हे नसो नशिबात तरी
आणखीही जळवशील मला तर
तो अधिकार आहे तुला