२०२०-०९-०९

गीतानुवाद-१६३: मेरे महबूब में क्या नहीं

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः नौशाद, गायकः लता, आशा
चित्रपटः मेरे महबूब, सालः १९६३, भूमिकाः साधना, निम्मी, राजेंद्रकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७१२ 

धृ

मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं
मेरे महबूब में क्या नहीं
वो तो लाखों में है एक हसीं
वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं

माझ्या सजणामधे काय कमी, काय कमी
माझ्या सजणामधे काय कमी
देखणा तो तर लाखांतही
देखणा तो तर लाखांतही, आहे सही

 

मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं
मेरे महबूब में क्या नहीं
भोली सूरत अदा नाज़नीं
भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं

माझ्या सजणामधे काय कमी, काय कमी
माझ्या सजणामधे काय कमी
भोळा चेहरा, लकब लाघवी
भोळा चेहरा, लकब लाघवी, लाघवी

आ ऽ ऽ
मेरा महबूब एक चाँद है
हुस्न अपना निखारे हुए

आ ऽ ऽ
प्रियकर माझा एक चंद्रमा
रूपसौंदर्ये दिपवित असा

 

ओ ऽ ऽ

ओ ऽ ऽ

 

आसमान का फ़रिश्ता है वो
रूप इन्सान का धरे हुए

आकाशीचा आहे तो देवदूत
रूप मनुजाचे धारण करून

 

ओ ऽ ऽ

ओ ऽ ऽ

 

रश्क-ए-जन्नत है वो महज़बीं
रश्क-ए-जन्नत है वो महज़बीं, महज़बीं

स्वर्गदुर्लभ छबी चंद्रसी
स्वर्गदुर्लभ छबी चंद्रसी, छबी चंद्रसी

आ ऽ ऽ
माह हो अन्जुम हो या कैकशां
सबसे प्यारा है मेरा सनम

आ ऽ ऽ
चंद्र, तारे, नक्षत्रे तळपू दे
प्रिय सर्वांत प्रियतम असे

 

आ ऽ ऽ

आ ऽ ऽ

 

उसके जलवों में है वो असर
होश उड़ जाये अल्लाह क़सम

तेजोवलयी त्या सामर्थ्य हे
भान ईश्वरशपथ हरपते

 

आ ऽ ऽ

आ ऽ ऽ

 

देखले गर उसे तू कहीं
देखले गर उसे तू कहीं, तू कहीं

त्याला पाहशील जर तू कुठे
त्याला पाहशील जर तू कुठे, तू कुठे

मेरा महबूब है जानेमन
करवा कदमाह रूह गुलबदन

प्रियतम जैसा जीवच की प्राण
छाती निधडी हृदय पुष्पवान

 

मेरा दिलवर है ऐसा जवान
हो बहारों में जैसे चमन

माझा दिलवर आहे इतका युवा
ऐन फुलला बहारीत मळा

 

उसकी चालों में ऐसी लचक
जैसे फूलों कि डाली हिले

चाल लवचिक, तनू खेळकर
गेंद झुलती जणू फांदीवर

 

उसकी आवाज़ में वो खनक
जैसे शीशे से शीशा मिले
उसके अंदाज़ है दिलनशीं

शब्दांत त्याच्या असे गुंजन
काच काचेवर वाजे छनन
ऐट आकर्षक आहे त्याची

 

भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं
मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं
मेरे महबूब में क्या नहीं

दोनो

भोळा चेहरा, लकब लाघवी, लाघवी
माझ्या सजणामधे काय कमी, काय कमी
माझ्या सजणामधे काय कमी 

तेरे अफ़सानों में मेरी जान
है झलक मेरी अफ़सानों कि

कहाण्यातून तुझ्या, हे सये
छटा माझ्या कथांची दिसे

 

दास्तानें है मिलती हुईं
अल्लाह हम दोनो परवानों

कथानकं जुळती आहेत ही
देवा, दोन्ही पतंगांचीही

 

परवानों की
एक ही शमा हो ना कहीं
वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं
मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं
मेरे महबूब में क्या नहीं

दोनो

पतंगांचीही
काय ज्योतही एकच तर नाही
देखणा तो तर लाखांतही, आहे सही
माझ्या सजणामधे काय कमी, काय कमी
माझ्या सजणामधे काय कमी

 

https://www.youtube.com/watch?v=JCDSttBef_U


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.