गीतानुवाद-०९९: तेरा जलवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०९९: तेरा जलवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१७-०८-१७

गीतानुवाद-०९९: तेरा जलवा जिसने देखा

मूळ हिंदी गीतकारः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायिकाः लता
चित्रपटः उजाला, सालः १९५९, भूमिकाः शम्मी कपूर, राज कुमार, माला सिन्हा, राजकुमार, कुमकुम
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०४०८


॥ धृ ॥
तेरा जलवा जिसने देखा, वो तेरा हो गया
मैं हो गयी किसी की, कोई मेरा हो गया
क्या देखा था तुझ में, दिल तेरा हो गया
ये सोचते ही सोचते, सवेरा हो गया

तुझा तोरा अनुभवला, तो तुझा झालेला
मी जाहले कुणाची, कुणी माझा झालेला
काय पाहिले तुझ्यात, जीव तुझ्यावर जडला
ह्या विचारांतच सरली रात, दिनही उगवला

१ 
है मुझ में भी ऐसा, अनोखा सा जादू
जो देखे वो होता हैं, दिल से बेकाबू
लगे तोसे नैना, तो नैना ना लागे
ख़यालों में डूबी हूँ तेरे, ओ बाबू
तू आया तो महफ़िल में उजाला हो गया

आहे माझ्यातही ऐसी, अनोखीसी जादू
जो पाहिल तो उसळून, होतो रे बेकाबू
नजरभेट झाली, तर झोपच उडाली
विचारांतच बुडले मी, तुझ्या रे बाबू
तू आलास आणि रंग मैफिलीस आला

२ 
तेरी एक झलक ने वो हालत बना दी
मेरे तनबदन में मोहब्बत जगा दी
कभी भूलकर आ इधर बहते पानी
किनारे पे रहती हूँ, फिर भी मैं प्यासी
अब दिल का क्यो करे गम गया सो गया

ओझरत्या दर्शनाने जी अवस्था केली
माझ्या शरीरातच एक प्रीत जागवली
कधी तरी चुकून ये, ना इकडे प्रवाहा
मी राहते किनारी, तरीही मी तहानली
का करू मी खंत, जीव तुझ्यावर जडला
॥ 
३ 
बुलाती है तुझको ये आँचल की छैया
ज़रा मुस्कुरा दे, पडूं तोरे पैय्या
कसम है तुझे दिल की जान-ए-तमन्ना
तुझे हमने माना है अपना ही सैय्या
मैं अकेली और तेरा जमाना हो गया
बोलावे तुला ही, ह्या पदराची छाया
जरा स्मित करशिल, तर पडते मी पाया
शपथ आहे तुला ही, पहा जीवलगा तू
तुला मानले आहे, मी साजण माझा
एकटिच मी, संसारच हा तुझा झालेला