गीतानुवाद-११८: जाने कहाँ गए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-११८: जाने कहाँ गए लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१८-०७-२१

गीतानुवाद-११८: जाने कहाँ गए वो दिन


मूळ हिंदी गीतकार: हसरत, संगीतः शंकर जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपटः मेरा नाम जोकर, भूमिकाः राज कपूर

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२२८

धृ
जाने कहाँ गए वो दिन
कहते थे तेरी राह में
नज़रों को हम बिछाएंगे
चाहे कहीं भी तुम रहो
चाहेंगे तुमको उम्र भर
तुमको ना भूल पाएंगे
जाणे कुठे गेले ते दिन
म्हणे मी, दृष्टी अंथरेन
मार्गी तुझ्या डोळे लावेन
राहा कुठेही तू तरी
चाहेन प्राण असेस्तोवर
विसरू न मुळी शकेन मी

मेरे कदम जहाँ पड़े
सजदे किये थे यार ने
मुझको रुला रुला दिया
जाती हुई बहार ने
गेलो जिथे, जिथे, तिथे
दिमतीस प्रिया असे तिथे
मला टाकले रडवून रडवून
सरत्या वसंताने इथे

अपनी नज़र में आज कल
दिन भी अंधेरी रात है
साया ही अपने साथ था
साया ही अपने साथ है
माझ्या दृष्टीने आजकाल
दिवसही अंधेरी रात आहे
छायाच होती सोबत अन्
छायाच सोबत आज आहे

इस दिल के आशियान में
बस उनके ख़याल रह गये
तोड़ के दिल वो चल दिये
हम फिर अकेले रह गये
निवासामधे ह्या अंतरी
तिचे फक्त विचार राहिले
ती गेली मोडून, माझे मन
मी एकटा पुन्हा राहिलो