गीतानुवाद-२२४: तुम मुझे यूँ भुला ना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२२४: तुम मुझे यूँ भुला ना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-०८-१२

गीतानुवाद-२२४: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

मूळ हिंदी गीतः हसरत, संगीतः शंकर जयकिसन, गायकः महंमद रफी
चित्रपटः पगला कहीं का, सालः १९७०, कलाकारः शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन 

मराठी अनुवादः २०२१०७१३

धृ

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
हाँ तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे

तू मला असे न विसरू शकशील
हो, तू मला असे न विसरू शकशील
जेव्हा कधी ऐकशील गीत माझे
माझ्यासोबत तूही गुणगुणू लागशील

वो बहारें वो चांदनी रातें
हमने की थी जो प्यार की बातें
उन नज़ारों की याद आएगी
जब खयालों में मुझको लाओगे

त्या बहारी, त्या चांदण्या रात्री
आपण केलेल्या प्रीतीच्या गोष्टी
त्या दृश्यांची यादही येईल
जेव्हा विचारांत तू मला आणशील

मेरे हाथों में तेरा चेहरा था
जैसे कोई गुलाब होता है
और सहारा लिया था बाहों का
वो समा किस तरह भुलाओगे

माझ्या हातात तुझा चेहरा होता
जणू कुठला गुलाब असतो तसा
आणि आधार हातांचा तुझ्या होता
ती सांज कशी विसरशील तू

मुझको देखे बिना क़रार ना था
एक ऐसा भी दौर गुज़रा है
झूठ मानूँ तो पूछलो दिल से
मैं कहूंगा तो रूठ जाओगे

मला पाहिल्याविना चैन नसे तुजला
एक काळ असाही गेलेला होता
खोटे वाटेल तर मना विचारून पाहा
मी म्हटले, तर तू रुसून जाशील

https://www.youtube.com/watch?v=Mkxh3xLkhMk