२०१६-१२-३१

गीतानुवाद-०८८: हजारो ख्वाहिशे ऐसी

मूळ उर्दू गीतकार: मिर्ज़ा ग़ालिब
गायक: जगजित सिंग / अबिदा परवीन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६१२३१धृ
हज़ारों ख्वाहिशें ऐसी की
हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान
लेकिन फिर भी कम निकले

हजारो ईप्सिते ऐसी,
उधळावे प्राण ज्यांवरती
उसळल्या कितीक आकांक्षा,
परी त्याही कमी ठरती
मोहब्बत में नहीं हैं फ़र्क़
जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं
जिस काफ़िर पे दम निकले

उरत नाही प्रीतीत मुळी,
भेद जगण्या नी मरण्यातही
तिला पाहून जगतो मी,
वाहिले प्राण जिच्यावरती
डरे क्यों मेरा क़ातिल,
 क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो खून, जो चश्म-ए-तर से
उम्र भर यूँ दम-ब-दम निकले

कशाला भय हवे मारेकर्या,
मुंडी धडावर राहिलही का?
रक्त जे ओघळे आयुष्यभर,
श्वासागणिक, तयाकरता
निकलना खुल्द से आदम का
सुनते आये हैं लेकिन
बहुत बेआबरू होकर
तेरे कुचे से हम निकले

ऐकले खूप स्वर्गातून की,
निष्कासीत मनू झाला
अनादर त्याहूनही माझा,
तुझ्या दारी असे झाला
हुई जिनसे तवक्को
खस्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज्यादा
ख़स्त-ए-तेघ-ए-सितम निकले

अपेक्षा ज्यांकडूनी मला,
राहिली दाद मिळण्याची
माझ्याहूनही अधिक
घायाळ ठरले जुल्मी घावांनी
खुदा के वास्ते परदा ना
काबे से उठा ज़ालिम
कहीं ऐसा ना हो याँ भी
वही काफ़िर सनम निकले

ईश्वरासाठी खला, उचलू नको,
काब्यावरील पडदा
न जाणो गूढ आकळता,
तिथे प्रियतमच असे उरला
कहाँ मयखाने का दरवाज़ा
'ग़ालिब' और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं
कल वो जाता था के हम निकले

कुठे मदिरालयाचे द्वार अन्
कुठे गुरूजी, अरे गालिब
तिथे ते काल गेलेले,
आज मी, सत्य हे एवढे माहित

पारितोषिकपत्रपारितोषिक वितरण समारंभ
प्र.ल.गावडे सभागृह, भावे प्रशाला, पेरुगेट पुणे येथे १२-१२-२०१६ रोजी संपन्न झाला.


समारंभास उपस्थित सुहृद!
संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्र.ल.गावडे ह्यांचे हस्ते पारितोषिकाचे प्रमाणपत्र स्वीकारतांना मी.
पाठीमागे दिसत आहेत डॉ. अ.नी. नवरे, संस्थेचे कार्यवाह.

२०१६-१२-०५

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पारितोषिक

माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.