गीतानुवाद-०५२: है इसी मे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०५२: है इसी मे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०७-०२

गीतानुवाद-०५२: है इसी मे प्यार की आबरू

मूळ हिंदी गीतकार: मेहंदीअली, संगीतः मदनमोहन, गायिकाः लता
चित्रपटः अनपढ, सालः १९६२, भूमिकाः माला सिन्हा,धर्मेंद्र

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०९०९

॥
धृ
॥
है इसी मे प्यार की आबरू
वो जफा करे मैं वफा करू
जो वफा भी काम न आ सके
तो वही कहे की मैं क्या करूँ
प्रेमाचा लौकिक हा स्मरू
मी करावे ते न त्याने करू
आली न रास ही प्रीत जर
तर करू मी काय दे तो वदू

॥
१
॥
मुझे गम भी उनका अजीज है
की उन्ही की दी हुई चीज है
यही गम हैं अब मेरी जिंदगी
इसे कैसे दिल से जुदा करूँ?
मज दुःख ही त्याचे रुजू असे
त्यानेच दिलेले म्हणून रुचे
दुःख हेच, आता जगणे माझे
हृदयातून कसे त्याला त्यजू

॥
२
॥
जो न बन सके वो मैं बात हूँ
जो न खत्म हो, वो मैं रात हूँ
ये लिखा है मेरे नसीब मे
यूँही शम्मा बन के जला करूँ
जे न साधले ते मी बोलणे
ती निशाही मी जी न संपते
हे आहे माझे विधीलिखीत
ज्योतीपरी अशी मी जळू

॥
२
॥
न किसी नजर की हूँ आरजू
न किसी नजर की हूँ जुस्तजू
मै वो फुल हूँ जो उदास हूँ
न बहार आए तो क्या करूँ
नजरची कुणाच्या न आस मी
नजरेचे कुणाच्या न ओज मी
जे कोमेजले आहे ते फूल मी
न वसंत येता मी काय करू