२०२४-०६-१६

गीतानुवाद-२९०: ये है रेशमी जुल्फों का

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः ओ.पी.नय्यर, गायकः आशा भोसले
चित्रपटः मेरे सनम, सालः १९६५, भूमिकाः विश्वजीत, आशा पारेख, मुमताज 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०६१६

 

धृ

ये है रेशमी
जुल्फों का अँधेरा
न घबराईये
जहाँतक महक है
मेरे गेसुओं की
चले आईये

हा आहे रेशमी
केसांचा अंधेर
तू नको घाबरू
जात जिथवर सुगंध
माझ्या केसांचा रे
ये तिथवरती तू

सुनिये तो जरा
जो हकिकत है
कहते है हम
खुलते रुकते
इन रंगीं
लबों की कसम
जल उठेंगे दिये
जुगनुओं की तरह
तबस्सुम तो
फरमाईये

ऐक तर, हे जरा
जे खरे तेच
मी सांगते
बोलत्या थांबत्या
या रंगीत
ओठांची शपथ
पेटतील हे दिवे
काजव्यांसारखे
स्मित थोडे तरी
झळकू दे

प्यासी है नजर
ये भी कहने की
है बात क्या
तुम हो मेहमां
तो न ठहरेगी
ये रात क्या
रात जाये रहे
आप दिल में मेरे
अरमां बन के
रह जाईये

तहानली आहे नजर
हे सांगायलाच
हवे आहे का?
पाहुणा तू आहेस
तर थांबेल न
ही रात का?
रात राहो सरो
तू ये हृदयी माझ्या
ईप्सित होऊन
रहा इथे