गीतानुवाद-२८६: अंधे जहान के अंधे रास्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२८६: अंधे जहान के अंधे रास्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२३-१२-०४

गीतानुवाद-२८६: अंधे जहान के अंधे रास्ते

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः तलत महमूद
चित्रपटः पतिता, सालः १९५३, भूमिकाः देवानंद, उषा किरण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१२०४

 

धृ

अंधे जहान के अंधे रास्ते
जाये तो जाये कहाँ
दुनिया तो दुनिया, तू भी पराया
हम यहाँ ना वहाँ

अंध जगाचे आंधळे रस्ते
जावे तर जावे कुठे
जग तर जगच, तू ही परका
मी इथे ना तिथे

१

जीने की चाहत नहीं
मर के भी राहत नहीं
इस पार आँसू, उस पार आहें
दिल मेरा बेज़ुबान

जगण्याची इच्छा नसे
मरूनही सुटका नसे
इकडे अश्रू, निश्वास तिकडे
मन मूकच माझे असे

२

हमको ना कोई बुलाये
ना कोई पलके बिछाये
ऐ ग़म के मारो मंज़िल वही है
दम ये टूटे जहाँ

पुकारे न कोणी मला
पाहे ना वाटही कुणी
दुःखितांचे गंतव्यच ते
प्राण हा जाईल जिथे

३

आगाज़ के दिन तेरा
अंजाम तय हो चूका
जलते रहे हैं, जलते रहेंगे
ये ज़मीन आसमान

निर्णयाच्या दिनी तुझा
निर्णय झालेला आहे
जळत राहती, जळतच राहतील
ही जमीन, हे आकाशही