गीतानुवाद-२३५: एक तू जो मिला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२३५: एक तू जो मिला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-१२-१८

गीतानुवाद-२३५: एक तू जो मिला

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता
चित्रपटः हिमालय की गोद में, सालः १९६५, भूमिकाः मनोजकुमार, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२११२१८

 

धृ

एक तू जो मिला, सारी दुनिया मिली
खिला जो मेरा दिल, सारी बगिया खिली

एक तू भेटलास सारे जगच भेटले
बहरले माझे मन, उपवने बहरली

तू सूरज मैं सूरजमुखी हूँ पिया
ना देखूँ तुझे तो खिले ना जिया
तेरे रंग मैं रंगी मेरे दिल की कली

तू सूर्य मी सूर्यमुखी आहे प्रिया
न पाहीन तुला तर चैन ना मला
तुझ्या रंगात रंगली मनाची कळी

अनोखा हैं बंधन ये कँगन साजन
बिना डोर के बंध गया मेरा मन
तू जिधर ले चल मैं उधर ही चली

अनोखे हे बंधन आहे कंकण प्रिया
बिना दोरीने बांधते बघ मला
तू जिथे नेसी मज, जातसे तिथे मी

कभी जो ना बिछड़े वो साथी हूँ मैं
तू मेरा दिया तेरा बाती हूँ मैं
बुझाया बुझी जलाया जली

कधी ना सोडे जी, अशी मी सोबती
तू दीपक माझा, वात मी रे तुझी
विझवता मी विझे, उजळता पेटती