२०१७-०५-३०

गीतानुवाद-०९३: आज की मुलाकात बस इतनी

मूळ हिंदी गीतः राजेंद्रकृष्ण, संगीतः रवी, गायक: लता, महेंद्र कपूर
चित्रपट: भरोसा, साल: १९६३, भूमिका: गुरुदत्त, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०६


धृ
आज की मुलाकात बस इतनी
कर लेना बाते कल चाहे जितनी
अच्छी नहीं होती है ज़िद इतनी
देखो हमें तुमसे हैं प्रीत कितनी
लता

महेंद्र
आजचे हितगूज आता बस इतके
कर उद्या गूज पुरे हवे तितके
जिद्द एवढी न बरी कधी असती
पहा माझी तुझ्यावरी प्रीती किती

प्यार जो किया है जताते हो क्यों
बात ऐसी होठों पे लाते हो क्यों
और हम जो पूछे सताते हो क्यों
अभी अभी आए, अब जाते हो क्यों
लता

महेंद्र
प्रेम जे केलेस तेच सांगसी किती
बोलतात कुणी का रे अशा गोष्टी
मी हे विचारतो का त्रस्त करसी
आताच आलीस तर जातेस कशी

कभी कभी ऐसे भी आया करो
चाँद निकले तो घर जाया करो
आएँगे जाएँगे मर्जीसे हम
प्यार है तो नाज़ भी उठाया करो
महेंद्र

लता

कधी कधी उगीचचही येत रहा तू
चंद्र उगवल्यावरच घरी जा ग तू
येईन मी जाईन मी मर्जीने माझ्या
प्रेम केले आहे तर तोराही जप हा

ठहरो मैं दिल को संभालूँ जरा
पलकों में तुम को छुपा लूँ जरा
समझे ना अब तक मोहब्बत है क्या
आओ तुम्हें ये भी समझालू जरा
महेंद्र

लता

थांब घेतो मनाला मी सावरून जरा
पापण्यांत घेतो तुला साठवून जरा
कळले ना आजवर प्रीत काय असे
ये तुला सांगते मी तीच काय असे

२०१७-०५-२३

’सूत्रशास्त्राचा’ उगम

’सूत्रशास्त्राचा’ उगम
.
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०५२२
.
’सूत्रशास्त्र’ (सायबरनेटिक्स) हा शब्द तुम्हाला कुठेतरी काळाशी जोडलेला असल्याचे जाणवते का? ’माहितीचा सर्वोच्च महामार्ग’ (इन्फर्मेशन सुपर हायवे) आणि जालधांडोळ (सर्फिंग-द-वेब) ह्या वाक्प्रचारां-प्रमाणेच, हा शब्दही महाजालाच्या (इंटरनेटच्या) अगदी सुरूवातीच्या युगात घेऊन जातो. तुम्ही एखाद्या माणसाला वैश्विक संसाधन स्थितीस्थापक (यू.आर.एल.-युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर) वाचायला सांगता आणि तो सुरू करतो......आकृतीबद्ध मजकूर अंतरण संकेतपद्धत, विसर्ग, चढती रेषा... (एच.टी.टी.पी.: / - हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकोल, कोलन, फॉर्वर्ड स्लॅश....). अगदी त्याप्रमाणेच.
.
पण आता जुनाट वाटणार्‍या प्रत्येक वाक्यप्रयोगाचे (सूत्रशास्त्र बाजार किवा सूत्रशास्त्र बाला -सायबरमॉल किंवा सायबरबेब- ह्या वाक्यप्रयोगांचा विचार करा) संपूर्णतः स्वीकारार्ह असे अनेक उपयोग पुढ्यात येतील, जसे की, सूत्रशास्त्र सुरक्षा किंवा सूत्रशास्त्र गुन्हे -सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम. निरंतर सुरूच असलेल्या सूत्रशास्त्र शब्दाच्या सुसंबद्धतेबाबत (रिलेव्हन्सचा) जर आपल्याला काही शंका असतील तर, गुन्हेगारी दृश्य तपास (सी.एस.आय.-क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन) ह्या अमेरिकन दूरदर्शन मालिकेच्या चौथ्या भागाचा विचार करा. सी.एस.आय.: सूत्रशास्त्र.
.
पण ’सूत्रशास्त्र’ हा चकवा शब्द कुठून बरे आला असावा?
.
सूत्रशास्त्रात्मक असे काहीही येण्याआधी आले सूत्रशास्त्र (सायबरनेटिक्स). १९५० च्या सुमारास जीवशास्त्रापासून तर अभियांत्रिकी व सामाजिक विज्ञानांच्या क्षेत्रांतील काही तज्ञांनी शोधून काढलेले सूत्रशास्त्र (सायबरनेटिक्स), हे सजीवांतील आणि यंत्रांतील, संचार (कॉम्युनिकेशन) आणि नियंत्रण प्रणालींचा अभ्यास करत असे. प्रणाली कशा कार्य करतात ह्यातील स्वारस्य, सूत्रशास्त्राच्या (सायबरनेटिक्स) व्युत्पत्तीतच दडलेले आहे. ग्रीक शब्द ’कुबेर्नेटेक्स’ म्हणजे कर्णधार. प्रमुख खलाशी. सुकाणूप्रवर्तक. सूत्रधार. त्यापासून तयार झाला शब्द सायबरनेटिक्स. सूत्रशास्त्र.
.
संगणकशास्त्र, जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी ह्या विस्तारत्या क्षेत्रांत ’सूत्रशास्त्रा’नी पार पाडलेल्या भूमिकेमुळेच ’सूत्रशास्त्र’ शब्दाला एक नवी झळाळी मिळाली. सूत्रशास्त्राचे झालेले लघुरूप ’सूत्र-’, हे लवकरच लोकांच्या हातात आलेले, ’नवीन नावे घडवण्याचे’ अवजारच ठरले. १९६० पासून आणि १९९० तून पुढेही, भाषेत ’सूत्र’ शब्दावर घडलेल्या अनेक शब्दांचा सुकाळच झाला. ज्यांत सूत्रकक्ष (सायबर क्युबिकल), सूत्रमित्र (सायबर फ्रेंड), सूत्रप्रेमी (सायबर लव्हर), सूत्रलब्धप्रतिष्ठित (सायबर स्नॉब), आणि सूत्रमेंढीगत (सायबर शीपीशली) ह्यासारखी क्रियाविशेषणेही समाविष्ट होती. सर्वाधिक काळ टिकून राहिलेली १९६० ची शब्दनिर्मिती अर्थातच होती सूत्रजीव (सायबोर्ग). सूत्रशास्त्रातला ’सूत्र’ (सायबरमधील सायब) आणि जीव-प्रणालीतील ’जीव’ (ऑर्गानिझममधील ऑर्ग) घेऊन सूत्रजीव (सायबोर्ग) हा शब्द तयार झाला. मानव-यंत्राचा तो संदर्भ देऊ लागला. नवीन पर्यावरणार्थ स्वतःचे अनुकूलन करून घेण्याचे सामर्थ्य बाळगणारा ठरला.
.
जरी ’सूत्रजीव’ शब्द मुळात एका शास्त्रीय शोधनिबंधात प्रकाशित झाला होता तरी, ती संकल्पना झपाट्याने वैज्ञानिक कथा-कादंबर्‍यांचा भाग झाली. दूरदर्शनवर ’सूत्रमानव’ (सायबर मेन) हा, १९६६ मध्ये ’डॉक्टर’ मालिकेद्वारे अवतरला. १९७२ मध्ये मार्टिन कैदिन ह्यांच्या ’सूत्रजीव’ (सायबोर्ग) कादंबरीत व्यक्त झाला. ती कादंबरी मग दोन दूरदर्शन खेळांची प्रेरणा ठरली. ’द सिक्स डॉलर मॅन’ आणि ’द बायोमिक वुमन’.
.
दोन दशकांहून अधिक काळ, सूत्रशास्त्रातले ’सूत्र’ स्वतःला अनेक शब्दांसोबत जोडून घेत होते. ’सूत्र-अवकाश’ शब्द १९८२ मध्ये प्रकट झाला. सकृतदर्शनी असे दिसते की, विल्यम गिब्सन ह्यांनी त्यांच्या वैज्ञानिक कादंबरीमध्ये -बर्निंग क्रोम- मध्ये तो घडवला. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी (ओ.ई.डी.) मधील सूत्र-अवकाश अथवा सूत्रावकाश शब्दाचा अर्थ ’आभासी वास्तवाचे अवकाश’, ज्यात (विशेषतः महाजालाद्वारे) विजकीय संचार घडून येतो असे काल्पनिक पर्यावरण, असा दिलेला आहे. जरी सूत्रजग (सायबर वर्ल्ड), सूत्रभूमी (सायबर लँड), सूत्रक्षेत्र (सायबेरिया) आणि सूत्रगोल (सायबर स्पिअर) अशी इतर सूत्र- स्वरूपे निर्माण झालेली असली तरी, ’सूत्रावकाश’ शब्द आजवर सर्वाधिक लोकप्रिय ’सूत्र-’ शब्द राहिलेला आहे. महाजालासह विजकीय संचारजगाकरता तो वापरला जातो. मात्र त्याची लोकप्रियता १९९० ते २००० ह्या दशकाच्या उत्तरार्धातच कळसास पोहोचलेली होती.
.
वि- (ई-) चा उदय आणि सूत्र- (सायबर-) ची नकारात्मक बाजू
.
जरी एके काळी महाजाल व नवीन तंत्रज्ञानांसंबंधी नावे घडवण्यात सूत्र- चा पगडा राहिलेला होता तरी, १९९० ते २००० दरम्यान वि- (ई-) चा उदय होताच सर्वच बदलले. आता सर्वत्र पुढे असलेल्या विद्युत निरोपामुळे (विरोपामुळे, ई-मेलमुळे) तांत्रिक शब्दनिर्मितीतली अतिशय उत्पादक पदावरची सूत्र- ची जागा आता वि- ने घेतलेली आहे. अगदी पूर्वीच्या सूत्र- स्वरूपांना स्वतःच्या आवृत्त्यांची भर घालतही. उदाहरणार्थ आता तुम्हाला सूत्र-व्यापार आढळून येणार नाही, त्याऐवजी वि-व्यापार (ई-कॉमर्स) किंवा वि-चलन (ई-करन्सी) हे शब्द आढळतील. वि- स्वरूपांचा उदय होऊनही महाजालाच्या अधिक नकारात्मक पैलूंबाबतचे शब्द घडवण्यात वि- ची फारशी प्रगती झाली नाही. सूत्रयुद्ध (सायबर वॉर), सूत्रहल्ला (सायबर ऍटॅक), सूत्रगुन्हे (सायबर क्राईम), सूत्रदहशतवाद (सायबर टेररिझम) आणि सूत्रगुंडगिरी (सायबर बुलिईंग) हे शब्द नेहमीपेक्षा अधिकच ठसठशीत झालेले आहेत. कदाचित सूत्र- आवृत्तीत अधिक स्पष्टता उपलब्ध असल्यामुळे असेल. २०१४ मधील सोनीवर, सूत्रदुष्टांकडून (सायबर क्रुक्सकडून) अनधिकार ताबा (हॅकिंग) मिळवून, जगभरातील निरनिराळ्या अधिकोषांतील (बँकांतील), एक अब्ज डॉलर्सच्या चोरीच्या अलीकडील प्रकरणामुळे, आणि अंकित साधनांवरून (डिजिटल डिव्हाईसेस वरून) तसेच सामाजिक जालांवरून (सोशल नेटवर्क्स वरून) केलेल्या गुंडगिरीच्या प्रकरणांमुळे, ह्या शब्दरचनांकडे अधिक लक्ष दिले जाऊ लागलेले आहे.
.
सूत्रगुन्ह्यांतील वाढ लक्षात घेता कुणालाही आश्चर्य वाटू नये की, गुन्हेगारी दृश्य तपास (सी.एस.आय.-क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन) नौकांवर उतरला आहे. वस्तुतः त्यामुळे सूत्र- प्रत्ययातील नकारात्मकता आणखीनच उंचावेल. काही प्रकरणांत सूत्र- काहीसा जुनाट पर्याय वाटू शकेल, पण अंकित वामकर्मांसंबंधात तर तो केवळ असंबद्धच वाटतो.
.
विशिष्ट सूचनाः
.
वरील लेख, खाली संदर्भात दिलेल्या लेखाचा केवळ मराठी अनुवाद आहे. सूत्रशास्त्रातील नव्या शब्दांचे अर्थ मराठीतून व्यक्त कसे करावेत ह्याचा वस्तुपाठ म्हणून हा अनुवाद करण्यात आलेला आहे. आपल्याला अनेकदा अडखळलेल्या, मूळ इंग्रजीतील अर्थ न कळलेल्या शब्दांचे अर्थ, मराठीतून समजावून सांगण्याचा हा प्रकार आहे. ह्या शास्त्राशी संबंधित नसणार्‍यांना, मुळात इंग्रजीतील शब्दही अनाकलनीय वाटू शकतात, तेव्हा मराठीतील पर्यायांबद्दल तर त्यांनी न बोललेलेच बरे.
.
संदर्भः
.
सायबर शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीतील अर्थ
http://blog.oxforddictionaries.com/2015/03/cyborgs-cyberspace-csi-cyber/

२०१७-०५-०८

गीतानुवाद-०९२: रात का समा, झूमे चंद्रमा

मूल हिंदी गीतकार: हसरत जयपुरी, संगीतकार: सचिन देव बर्मन, गायक: लता मंगेशकर,
चित्रपट: जिद्दी, सालः १९६४, भूमिकाः आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०२०५


प्र
स्ता
आया न कोई ऐसे यहाँ
छम से न होगा
ओ काम किया हमने वो
रुस्तम से न होगा
आले न कुणी इथे असे
छ्मकन कधी असेल
जे काम मी केले आहे ते
रुस्तमनेही केले नसेल

धृ
रात का समा, झूमे चंद्रमा
तन मोरा नाचे रे, जैसे बिजुरियाँ

रात्रीचा सुमार, रमे चंद्रमा
तन माझे नाचे रे, जैसी विद्युल्लता
देखो, देखो, देखो, हूँ नदी प्यार की
सुनो, सुनो, सुनो, बाँधे मैं ना बँधी
मैं अलबेली, मान लो बड़ी जिद्दी
माने मुझ को जहाँ

पाहा, पाहा, पाहा, मी नदी प्रीतीची
ऐका, ऐका, ऐका, बांधले जाई न मुळी
मी मुक्ताई, समजा फारच जिद्दी,
माने जगच मला
नाचू, नाचू, नाचू, मोरनी बाग की
डोलू, डोलू, डोलू, हिरनियाँ मदभरी
घूँघर बाजे, छमाछम घूँघर बाजे
आरजू है जवान

नाचू, नाचू, नाचू, मैना बागेतली
डोलू, डोलू, डोलू, हरणीत्त मी
घूँघरू वाजे, छमाछम घूँघरू वाजे
आसक्ती आहे युवा

धीरे, धीरे, धीरे, जीत मेरी हुई
होले, होले, होले, हार तेरी हुई
तेरी तरह, जा रे जा बहोत देखे
मुझसा कोई कहाँ

हळू, हळू, हळू जीत माझी झाली
हळू, हळू, हळू हार तुझी झाली
तुझ्यापरी, जा रे जा खूप जरी
कोणी मजपरी कुठेय