गीतानुवाद-२५९: सपने सुहाने लड़कपन के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२५९: सपने सुहाने लड़कपन के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-१२-१८

गीतानुवाद-२५९: सपने सुहाने लड़कपन के

मूळ हिंदी गीतकार: शकील, संगीत: हेमंतकुमार, गायीका: लता
चित्रपट: बीस साल बाद, सालह १९६२ भूमिका: विश्वजीत, वहिदा रहेमान 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०११७

धृ

सपने सुहाने लड़कपन के
मेरे नैनों में डोले बहार बन के

सुंदरशी स्वप्ने लहानपणची
माझ्या डोळ्यात झुलती बहार भरती

जब छाए घटा मतवाली
मेरे दिल पे चलाए आरी
घबराये अकेले मनवा
मैं लेके जवानी हारी
कैसे कटें दिन उलझन के
कोई लादे ज़माने वो बचपन के

जेव्हा रात्र पडे मदमस्त
चालवी मनावर अस्त्र
घाबरे एकटे मन हे
मी यौवन घेऊन हरते
सरतील कसे दिस हे भ्रांतीचे
कुणी आणा ना ते दिस आवडते  

जब दूर पपीहा बोले
दिल खाये मेरा हिचकोले
मैं लाज में मर-मर जाऊँ
जब फूल पे भंवरा डोले
छेड़े पवनिया तराने जब मन के
मुझे भाये न ये रंग जीवन के

जेव्हा दूर कोकिळा बोले
मन हिंदोळ्यावर डोले
मी लाजेने चूरच होते
जव भ्रमर फुलावर खेळे
जव वारा स्फुरे गीत अंतरी ’ते’
मला रुचती ना हे रंग जगतीचे