मूळ हिंदी गीतः हसरत, संगीतः वसंत देसाई, गायीकाः लता
चित्रपटः गुंज उठी शहनाई, साल: १९५९, भूमिकाः राजेंद्र कुमार, अमित, अनिता गुहा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५०४
धृ
|
तेरे सुर और मेरे गीत दोनो मिल कर बनेगी प्रीत
|
तुझे सुर आणि माझे गीत दोन्ही मिळुन पूर्ण होईल प्रीत
|
१
|
धड़कन में तू है समाया हुआ आ आ आ आ खयालों में तू ही तू छाया हुआ दुनिया के मेले में लाखों मिले आ आ आ आ दुनिया के मेले में लाखों मिले मगर तू ही तू दिल को भाया हुआ मैं तेरी जोगन तू मेरा मीत
|
हृदयस्पंदने व्यापुनी राहसी आ आ आ आ विचारांतही तूच तू राहसी दुनियेच्या जत्रेत लाखो, परी आ आ आ आ दुनियेच्या जत्रेत लाखो, परी रुचसी मनाला, हृदी राहसी मी रे प्रिया तव, तू माझा खचित
|
२
|
मुझको अगर भूल जाओगे तुम आ आ आ आ मुझसे अगर दूर जाओगे तुम मेरी मुहब्बत में तासीर है आ आ आ आ मेरी मुहब्बत में तासीर है तो खींच के मेरे पास आओगे तुम देखो हमारी होगी जीत
|
विसरून मला जर का जाशील तू आ आ आ आ मजपासूनी दूर जाशील जर तू प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी आ आ आ आ प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी की ओढीने येशील पुन्हा मजप्रती पाहा राजसा आपली हीच जीत
|
https://www.youtube.com/watch?v=ljG6atDKyxo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.