मूळ हिंदी गीतकारः भरत व्यास, संगीतः कल्याणजी वीरजी शाह, गायकः लता, रफी
चित्रपटः सम्राट चंद्रगुप्त, सालः १९५८, भूमिकाः भारतभूषण, निरूपमा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८३१
॥ धृ ॥
|
लताः चाहे पास हो, चाहे दूर हो मेरे, सपनों की तुम तस्वीर हो रफीः चाहे पास हो, चाहे दूर हो मेरे, जीवन की तुम तकदीर हो
|
लताः राहा दूर वा, राहा समीप तू माझ्या स्वप्नातलीच तस्वीर तू रफीः राहा दूर वा, राहा समीप तू माझ्या जिण्याचे विधिलिखीत तू
|
॥ १ ॥
|
लताः ओ परदेसी भूल न जाना हमने किया तुझे दिल नज़राना रफीः दिल ये हमारा तूने ने जाना सीखा है हमने भी, वादा निभाना
|
लताः रे परदेशा विसरू नको तू मी मन माझे तुजसी दिले रे रफीः हे मन माझे तू न जाणसी वचन पाळणे शिकलो आहे मी
|
॥ २ ॥
|
रफीः जब तक चमके चाँद सितारे हम हैं तुम्हारे,
तुम हो हमारे लताः सागर की ये लहर पुकारे मिल के रहेंगे, दोनो किनारे
|
रफीः जोवर तळपती चंद्र नी तारे तू माझी अस, मीही तुझाची लताः सागराची ही लाट सांगते नक्कीच मिळतील दोन्ही किनारे
|
https://www.youtube.com/watch?v=z5b-BKTRKS0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.