गीतानुवाद-०१७: हमने देखी है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०१७: हमने देखी है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१३-०६-०९

गीतानुवाद-०१७: हमने देखी है

मूळ हिंदी गीत: गुलजार, संगीत: हेमंतकुमार, गायिका: लता
सिनेमा: खामोशी, सालह १९६९, भूमिका: स्नेहलता, वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र

नरेंद्र गोळे २००४ १० २०




धृ
हमने देखी है, उन आखोंकी महकती खुशबु
हाथसे छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम दो
सिर्फ़ एहसास है, यह रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो
मी तर अवलोकिलीडोळ्यांतली सुगंध-कुपी
हात लावून तिला, नात्यांचे आरोप करा
फक्त अनुभव आहे, हा आत्म्यानी अनुभूत करा
प्रेमाला प्रेम म्हणा, आणखी काही नाव द्या

प्यार कोई बोल नहीं प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
यह बुझती है ना रुकती है ठहरी है कही
 नूर की बूंद है सदीयों से बहा करती है
प्रेम काही बोल नाहीत, प्रेम आवाज नाही
निरव शांती आहे, बोलते जी अन् ऐकतेही
ही विझते मुळी, ही थांबते, ना थांबलेली
दीप्ती वाहत आहे, शतकानुशतक सारखी जी

मुस्कराहट सी खिली रहती है आंखों में कहीं
और पलकों पे उजाले से झुके रहते है
होंठ कुछ कहते नहीं काँपते होठोंपे मगर
कितने खामोश से अफ़साने रूके रहते है
स्मितहास्यासम फुललेली ती, डोळ्यात कुठे
आणि पापण्यावरी ते तेज, विखुरलेले दिसे
ओठ बोलत नाहीत पण, थरथरती आत कुठे
जणु लपवित ते, कहाण्या किती अबोल तिथे