गीतानुवाद-०५५: जरासी आहट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०५५: जरासी आहट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०७-२३

गीतानुवाद-०५५: जरासी आहट

मूळ गीतकारः कैफी आज़मी, गायिकाः लता
चित्रपटः हकिकत, सालः १९६४, भूमिकाः बलराज सहानी, धर्मेंद्र

मराठी अनुवादः  नरेंद्र गोळे २००४०१०१

॥
धृ
॥
जरासी आहट होती है, तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
जराशी चाहुल येताही, मनी काहूर दाटे
काय हा तो तर नव्हे, काय हा तो तर नव्हे


॥
१
॥
छुप के सीने में कोई, जैसे सदा देता है
शाम से पहले दिया, दिल का जला देता है
है उसी की ये सदा, है उसी की ये अदा
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
जणू लपून अंतरी, आवाज कुणी देत आहे
सांजदिव्या आधीच, तो हृदयदीप चेतवितो
चाहूल त्याचीच आहे, लकबही त्याचीच आहे
काय हा तो तर नव्हे, काय हा तो तर नव्हे

॥
२
॥
शक्ल फिरती है, निगाहों मे वो ही प्यारी सी
मेरी नसनस में, मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा, किस के दामन की हवा
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
चेहरा मोहक असा, नयनी सदा तो राहे
रोमरोमी जणू, स्फूर्ती उसळी घेत आहे
स्पर्शुनी गेली मला, झुळूक कोणत्या तनुची
काय हा तो तर नव्हे, काय हा तो तर नव्हे



.