गीतानुवाद-०५१: अजीब दास्तां है ये लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०५१: अजीब दास्तां है ये लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०६-२२

गीतानुवाद-०५१: अजीब दास्तां है ये

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायीकाः लता
चित्रपटः दिल अपना और प्रीत पराई, सालः १९५९, भूमिकाः मीना कुमारी, नादिरा, हेलन, राजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९०६



धृ
अजीब दास्तां है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
न वो समझ सके न हम
अजब कहाणी आहे ही
कुठे सुरू कुठे सरे
ही ईप्सितेही कोणती
कळली त्या, न मलाही ती

(ये रोशनी के साथ क्यों
धुआँ उठा चिराग से) \-
ये ख़्वाब देखती हूँ मैं
के जग पड़ी हूँ ख़्वाब से
या उजेडासोबत हा का
धूर उठतसे दिव्यामधून
हे स्वप्न पाहते आहे मी
की जागले मी स्वप्नातून

(मुबारकें तुम्हें के तुम
किसीके नूर हो गए)  \-
किसीके इतने पास हो
के सबसे दूर हो गए
शुभेच्छा तुला की तू
कुणाचा दीप जाहलास
कुणाच्या निकट तू एवढा
सगळ्यांच्या दूर जाहलास

(किसीका प्यार लेके तुम
नया जहाँ बसाओगे) \-
ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे
कुणाचे प्रेम घेऊन तू
नवे जगच तू वसवशील
ही सांज येवो केव्हाही
मला जरूर तू आठवशील