गीतानुवाद-२८७: ये हवा ये रात ये चाँदनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२८७: ये हवा ये रात ये चाँदनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२३-१२-३०

गीतानुवाद-२८७: ये हवा ये रात ये चाँदनी

मूळ हिंदी गीतः राजिंदर कृष्ण, संगीतः सज्जाद हुसैन, गायकः तलत महमूद
चित्रपटः संगदिल, सालः १९५२, भूमिकाः दिलिपकुमार, मधुबाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१२३०

 

धृ

ये हवा, ये रात ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यों ना हो तेरी आरजू
तेरी जुस्तजू में बहार है

ही हवा ही रात हे चांदणे
मीठ मोहरी तव विभ्रमी
तुझी ओढ का लागू नये
शोधच तुझा ग बहार आहे

तुझे क्या खबर है, ओ बेख़बर
तेरी एक नज़र में है क्या असर
जो गजब में आए तो कहर है
जो हो मेहरबां तो करार है

तुला काय माहित अज्ञ तू
नजरेत तव आहे जरब किती
ती जर कोपली तर कहर आहे
जर ती लोभली तर धीर दे

तेरी बात, बात है दिलनशी
कोई तुझ से बढ़ के नहीं हसीन
है कली कली पे जो मस्तियाँ
तेरी आँख का ये खुमार है

तुझी गोष्ट, गोष्टच प्रियतमे
कुणी सुंदर न तुजपरी सुंदरे
जी कळी कळीवर मस्ती ती
नजरेतली तव धुंद आहे