गीतानुवाद-२६२: दुनियाँ करे सवाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२६२: दुनियाँ करे सवाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-१२-१९

गीतानुवाद-२६२: दुनियाँ करे सवाल तो हम क्या जबाब दे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतकार: रोशन, गायक: लता मंगेशकर
चित्रपट: बहू बेगम, सालः १९६७, भूमिकाः मीनाकुमारी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१९

धृ

दुनियाँ करे सवाल, तो हम क्या जबाब दे
तुम कौन हो ख़याल, तो हम क्या जबाब दे

विचारेल जग मला, तर मी काय उत्तरू
तू कोण ह्या विचारास, मी काय उत्तरू

१

पूछे कोई के दिल को कहाँ छोड़ आये हो
किस किस से अपना रिश्ता-ए-जान जोड़ आये हैं
मुश्किल हो अर्ज-ए-हाल तो, हम क्या जबाब दे

विचारेल कोणी चित्त कुठे सोडलेस तू
आपला कुणाकुणाशी जीव जडवलास तू
सांगणे असेल कठीण, तर मी काय उत्तरू

२

पूछे कोई दर्द-ए-वफ़ा कौन दे गया
रातों को जागने की सजा कौन दे गया
कहने पे हो मलाल, तो हम क्या जबाब दे

विचारेल प्रीतीदुःख कुणी तुज दिले असे
रात्रीस जागण्याची सजा कुणी दिली असे
बोलून होय दुःख, तर मी काय उत्तरू