गीतानुवाद-१८१: ओहो रे ताल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१८१: ओहो रे ताल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-०१-२९

गीतानुवाद-१८१: ओहो रे ताल मिले

मूळ हिंदी गीत: इंदीवर, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: अनोखी अदा, भूमिका: संजीव कुमार, झाहीदा 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६११२५

 

धृ

ओ हा, खैर है, खैर है, खैर है
ओहो रे ताल मिले नदी के जल में
नदी मिले सागर में
सागर मिले कोनसे जल में?
कोई जाने ना

ओ हा, खैर है, खैर है, खैर है
भेटे तलाव रे नदीसी
नदी भेटे सागरासी
सागर भेटतो कुणासी?
कुणी जाणे ना

सूरज को धरती तरसे
धरती को चंद्रमा
पानी में सिप जैसे
प्यासी हर आत्मा
ओ मितवा रे
पानी में सिप जैसे
प्यासी हर आत्मा
बुंद छुपी किस बादल में
कोई जाने ना

सूर्यास्तव धरती वेडी
धरतीस्तव चंद्रमा
पाण्यातील शिंपेपरी
तहानेला आत्मा
ओ मित्रा रे
पाण्यातील शिंपेपरी
तहानेला आत्मा
थेंब मेघी लपले कुठल्या
कुणी जाणे ना

अन्जाने होठोंपर क्यूँ
पहचाने गीत हैं
कलतक जो बेगाने थे
जन्मों के मित हैं
ओ मितवा रे
कलतक जो बेगाने थे
जन्मों के मित हैं
क्या होगा कोनसे पल में
कोई जाने ना

अनोळखी ओठांवर का
गीत ओळखीचे
अनोळखी इथवर होते
आज ते जीवाचे
ओ मित्रा रे
अनोळखी इथवर होते
आज ते जीवाचे
होईल काय क्षणात कुठल्या
कुणी जाणे ना

 

https://www.youtube.com/watch?v=9Za8ZtfHXXY