गीतानुवाद-२७२: ना ना करते प्यार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२७२: ना ना करते प्यार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२३-०५-३१

गीतानुवाद-२७२: ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे

मूळ हिंदी गीत: आनंद बख्शी, संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: रफी, सुमन कल्याणपूर
चित्रपट: जब जब फुल खिले, साल: १९६५, भूमिका: शशी कपूर, नंदा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०९१६

धृ

ना ना करते, प्यार तुम्ही से कर बैठे
करना था इन्कार, मगर इक़रार
तुम्हीं से कर बैठे

सु:

ना ना म्हणता, प्रेम तुझ्यावर मी केले
नव्हता मनी होकार, तरी होकार,
तुला देऊन बसले

 

हम को है पता
जो तुम्हारी दास्ताँ थी
होंठों पे तो ना थी
जा झूठे !
होंठों पे तो थी
मगर दिल में हाँ थी
कोई दिल देगा
अनाड़ी अनजान को
हमने दे दिया है
तो मानो एहसान को
हम भूले इक बार, कि आँखें चार
तुम्हीं से कर बैठे

मो:



सु
:
मो:
सु:

कहाणीची तुझ्या
माहिती मला होती
ओठांवर ना होते
जा खोटारड्या !
ओठांवर ना होते,
पण हो होते अंतरी
कोणी जिव ना जडवेल,
अडाणी, अनोळख्याशी
जीव दिला मी तुजला
त्या मान उपकारासी
चुकले मी एक वार, दृष्टिव्यवहार
तुझ्यासव मी केले

छोड़ो रहने भी दो
ये झूठे अफ़साने
ऐसा क्या है तुम में
जा झूठी !
ऐसा क्या है तुम में
कि हम हो दीवाने
फिर भी तुमने ख़्वाबों में
आना नहीं छोड़ा
तीर नज़रों के चलाना नहीं छोड़ा
ये शिक़वा सरकार, हज़ारों बार,
तुम्हीं से कर बैठे

सु:



मो
:
सु:
मो:

राहू दे ना खोट्या
तू आता ह्या कहाण्या
तुझ्यात आहे काय?
जा खोटारडे !
तुझ्यात आहे काय?
की व्हावे वेडे मीही
तरीही स्वप्नांमध्ये
तू येणे सोडीले
तीर नजरेचे चालविणे सोडीले
हुजूर ही तक्रार, हजारो वार,
तुझ्याकडं मी करतो