गीतानुवाद-११७: तेरी प्यारी प्यारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-११७: तेरी प्यारी प्यारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१८-०७-१५

गीतानुवाद-११७: तेरी प्यारी प्यारी सुरत को




मूळ हिंदी गीतः हसरतज जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः रफी
चित्रपटः ससुराल, भूमिकाः राजेंद्रकुमार, सरोजादेवी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१०२१

॥
धृ
॥
तेरी प्यारी प्यारी सुरत को
किसीकी नजर ना लगे
चष्म-ए-बद्दूर
मुखडे को छुपालो आंचल में
कहीं मेरी नजर ना लगे
चष्म-ए-बद्दूर
तुझ्या हव्या हव्याशा चेहर्‍याला
कुणाची न दृष्ट लागो
दृष्ट हो दूर
चेहर्‍यास करी पदराआड
माझीही न दृष्ट लागो
दृष्ट हो दूर

॥
१
॥
यूँ न अकेले फिरा करो
सबकी नजर से डरा करो
फुल से ज्यादा नाजुक हो तुम
चाल सम्हल कर चला करो
जुल्फों को गिरा लो गालों पर
मौसम की नजर ना लगे
अशी न एकटी कधी फिरू
नजरांना सर्वच लाग भिऊ
फुलाहूनी बहू नाजुक असशी
जपून चाल तू हळू हळू
केसांना सोड गालांवर तू
कधी ऋतुची न दृष्ट लागो

॥
२
॥
एक झलक जो पाता है
राही वहीं रुक जाता है
देख के तेरा रूप सलोना
चाँद भी सर को झुकाता है
देखा न करो तुम आईना
कहीं खुद की नजर ना लगे
दर्शन एक मिळे ज्याला
तिथेच प्रवासी तो थांबला
पाहून सुंदर रूप तुझे
तो चंद्रही चेहरा लपवू पाहे
कधी पाहू नको तू आईना
स्वतःचीच न दृष्ट लागो