मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायक: लता
चित्रपटः दिल एक मंदिर, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, मीना कुमारी, राजकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२२
॥
धृ
॥
|
रुक जा रात ठहर जा रे चंदा
बीते न मिलन की बेला
आज चांदनी की नगरी में
अरमानों का मेला
|
थांब ए रात्री, थांब तू चंद्रा
सरो न भेटीची वेळा
आज चांदण्याच्या नगरीतच
अभिलाषांचा मेळा
|
॥
१
॥
|
पहले मिलन की यादें लेकर
आई है ये रात सुहानी
दोहराते हैं चाँद सितारे
मेरी तुम्हारी प्रेम कहानी
|
पहिल्या भेटीची सय
घेऊन ही
आली पाहा ही रात्र
साजिरी
पुन्हा चंद्र-नी-तारे घडवती
तुझी नी माझी
प्रेमकहाणी
|
॥
२
॥
|
कल का डरना काल की चिंता
दो तन है मन एक हमारे
जीवन सीमा के आगे भी
आऊँगी मैं संग तुम्हारे
|
कालची भीती काल क्षिती अन्
दोन शरीरे मन एक
आमचे
जीवनरेषे पलीकडेही
येईन संगती मी सखया रे
|