२०२०-०९-०८

गीतानुवाद-१५९: ये रात ये चाँदनी

मूळ हिंदी गीत: साहिर लुधियानवी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः लता हेमंतकुमार
चित्रपटः जाल, सालः १९५२, भूमिकाः देव आनन्द, गीता बाली, के.एन.सिंग 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०४२०

धृ

ये रात ये चाँदनी
फिर कहाँ
सुन जा दिल की
दास्तां

ही रात हे चांदणे
ना पुन्हा
ऐकून जा ना
हृद्-कथा

पेड़ों की शाखों पे
सोई सोई चाँदनी
तेरे खयालों में
खोई खोई चाँदनी
और थोड़ी देर में
थक के लौट जाएगी
रात ये बहार की
फिर कभी आएगी
दो एक पल और है ये समा

झाडांच्या फांद्यांवर
सूप्तसे चांदणे
तुझ्याच विचारांत
गुंतलेले चांदणे
थोड्या वेळातच ते
कंटाळून परत फिरेल
रात ही बहारीची
ना पुन्हा कधी असेल
दो-एक क्षण आणखी ही मजा

लहरों के होंठों पे
धीमा धीमा राग है
भीगी हवाओं में
ठंडी ठंडी आग है
इस हसीन आग में
तू भी जलके देखले
ज़िंदगी के गीत की
धुन बदल के देखले
खुलने दे अब धड़कनों की ज़ुबाँ

लाटांच्या ओठांवर
विलंबित राग हा
सर्द ह्या हवेमधे
थंडगार क्षोभ हा
ह्या धगीत हव्या हव्या
तू ही तळमळून पाहा
जीवनाच्या गीताची
लय बदलुनी पाहा
या उमटू दे स्पंदनांची कथा

जाती बहारें हैं
उठती जवानियाँ
तारों के छाओं में
कह ले कहानियाँ
एक बार चल दिये
गर तुझे पुकारके
लौटकर आएंगे
क़ाफ़िले बहार के
आजा अभी ज़िंदगी है जवाँ

सरता वसंत आहे
सरते आहे यौवन
सावलीत तार्यांच्या
गूजगोष्टी घे करून
एकदा परतले जर
बोलावून तुला का ते
येतील ना फिरून मग
काफिले बहारींचे
ये अजूनही ही जिंदगी आहे युवा

धृ

चाँदनी रातें प्यार की बातें
खो गयी जाने कहाँ
ये रात ये चाँदनी फिर कहाँ
सुन जा दिल की दास्तां

चांदण्या रात्री प्रेमाच्या गोष्टी
गेल्या कुठे कळे कुणा
ही रात्र हे चांदणे ना पुन्हा
ऐकून जा ना हृद्-कथा

आती है सदा तेरी
टूटे हुए तारों से
आहट तेरी सुनती हूँ
खामोश नज़ारों से
भीगी हवा उमड़ी घटा
कहती है तेरी कहानी
तेरे लिये बेचैन है
शोलों मे लिपटी जवानी
सीने मे बल खा रहा है धुआं

येते आठवण रे तुझी
तुटत्या तार्यांच्या सवे
ऐकते चाहूल तुझी
गुपचुप दृश्यांच्या सवे
सर्द हवा अंधार रात
सांगे कथा ही तुझी रे 
बेचैन हे तुझ्यासाठी रे
धडकते हे यौवन पहा
हृदयात वलये धुरांची पहा

लहरों के लबों पर हैं
खोये हुए अफ़साने
गुलज़ार उम्मीदों के
सब खो गये वीराने
तेरा पता पाऊं कहाँ
सूने हैं सारे ठिकाने
जाने कहाँ गुम हो गये
जाके वो अगले ज़माने
बरबाद है आरज़ू का जहाँ

लाटांच्या ओठी या
विरत्या कथा कशा
फुलागत आशेच्याही
झाल्या शोकांतिका
पत्ता तुझा शोधू कुठे
सार्याच जागा रिकाम्या
जाणे कुठे जणू लोपले
उद्याचे ते जग आपले
आशेस ना ठाव मुळि राहिला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.