गीतानुवाद-३२२: कैसी खुशी लेके आया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-३२२: कैसी खुशी लेके आया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२६-०५-२९

गीतानुवाद-३२२: कैसी खुशी लेके आया चाँद

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन, गायकः लता
चित्रपटः बरसात की रात, सालः १९६०, भूमिकाः भारतभूषण, मधुबाला, शामा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०५२९

 

धृ

कैसी खुशी लेके आया चाँद, ईद का
मुझे मिल गया बहाना तेरी दीद का

किती ही खुशी घेऊन आला चंद्र ईदिचा
मला लाभला बहाणा तुला पाहण्याचा

ज़ुल्फ़ मचलके खुल खुल जाये
चाल में मस्ती घुल घुल जाये
ऐसी खुशी आज मिली
आज मिली ऐसी खुशी
आँखों मैं नाम नहीं, नींद का

केश उसळून खुले होत जात
चालीत मस्ती मिसळून जात
आज झाली असली खुशी
असली खुशी आज झाली
झोपेचे नाव नाही डोळ्याला

जागती आँखें बुनती हैं सपने
तुझको बिठाके पहलू में अपने
दिल की लगी ऐसी बढी
ऐसी बढी दिल की लगी
आँखों मैं नाम नहीं नींद का

जागते डोळे पाहती स्वप्ने
तुला बसवून बाजूस आपल्या
जडले माझे मन हे किती
मन हे किती जडले माझे
झोपेचे नाव नाही डोळ्याला

आते ही तेरे जागती है कलिया
दिल बन बनकर धड़की है गलिया
ऐसी सजी रात मेरी
रात मेरी ऐसी सजी
आँखो मे नाम नही नींद का

तू येताच खुलती या कळ्या
हृदय बनुनच धडकती गल्ल्या
अशी सजली रात माझी
रात माझी अशी सजली
झोपेचे नाव नाही डोळ्याला