गीतानुवाद-०४१: हर घड़ी बदल रही है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०४१: हर घड़ी बदल रही है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०५-३१

गीतानुवाद-०४१: हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी

मूळ हिंदी गीतकार: जावेद अख्तर, चित्रपट: कल हो न हो, साल: २००४
भूमिका: शाहरुख खान, सैफ अली खान, प्रिती झिंटा, जया भादुरी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०४०३

॥धृ॥
हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
 छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
 जो है समाँ कल हो न हो
हर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी
सावली आहे कधी, आहे ऊन जिंदगी
हर क्षण इथे मनभर जगा
अशी वेळ ये, ना ये पुन्हा

॥१॥
चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वह मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वह मेहरबाँ कल हो न हो
तुम्हाला जो खरा चाहतो
कठीण आहे लाभणे तो
असा जो कुणी, आहे जिथे
सुस्वरूप तोच सर्वांत आहे
त्या व्यक्तीला संगत धरा
अनुकूल ती, ना हो पुन्हा

॥२॥
पलकों के ले के साये
पास कोई जो आये
लाख सम्भालो पागल दिल को
दिल धड़के ही जाये
पर सोच लो इस पल है जो
वो दास्ताँ कल हो न हो
पापण्यांची करून छाया
निकट येई कुणी जेव्हा
सांभाळले कितीही तरी ते
हृदय वेगे स्पंदू लागे
बघ ह्या क्षणी, जी घडत ती
ती कहाणी ना हो पुन्हा