२०२०-०९-२४

गीतानुवाद-१७३: एक रात में दो दो चाँद खिले

मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिशन, संगीतः चित्रगुप्त श्रीवास्तव, गायकः लता मंगेशकर, मुकेश
चित्रपटः बरखा, सालः १९५९, भूमिकाः जगदीप, नंदा, अनंतकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५२८

धृ

एक रात में दो दो चाँद खिले
एक रात में दो दो चाँद खिले
एक घूंघट में, एक बदली में
अपनी अपनी मंझिल से मिले
एक घूंघट में एक बदली में

एका रात्रीत चंद्रमे दोन कसे
एका रात्रीत चंद्रमे दोन कसे
पदरात आणि ढगाआड असे
आप-आपल्या साध्याशी वसे
पदरात आणि ढगाआड असे

बदली का वो चाँद तो सबका है
घूंघट का वो चाँद तो अपना है
मुझे चाँद समझने वाले बता
ये सच है या एक सपना है
एक रात में दो दो चाँद खिले

ढगाआडचा चंद्र सर्वांचा असे
पदरात परी आपलाच वसे
वद, चंद्र समजणार्या तू मला
की हे सत्य असे वा स्वप्न असे
एका रात्रीत चंद्रमे दोन कसे

मालूम नहीं दो अन्जाने
राही कैसे मिल जाते हैं
फूलों को अगर खिलना हो
वीराने में भी खिल जाते हैं
एक रात में दो दो चाँद खिले

अनोळखी दो, मला कळे
भेटती मार्गातील पथिक कसे
फुलायचे जर फुलांना असेल
वैराण जागीही फुलती फुले
एका रात्रीत चंद्रमे दोन कसे


https://www.youtube.com/watch?v=m2-Dg3DrHx4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.