२०२०-०९-०९

गीतानुवाद-१६२: छोडो कल की बाते

मूळ हिंदी गीतकारः प्रेम धवन, संगीतः उषा खन्ना, गायकः मुकेश
चित्रपटः हम हिंदोस्तानी, सालः १९६०, भूमिकाः सुनील दत्त

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१२१०१९ 


धृ

छोडो कल की बाते कल की बात पुरानी
नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी
हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी

सोडा झाल्या गोष्टी त्या गोष्टी पुराण्या
नव्या युगाच्या मिळून घडवू आम्ही नव्या कहाण्या
आम्ही लोक भारती आम्ही लोक भारती



आज पुरानी जंजीरों को तोड चुके है
क्या देखे उस मंझिल को जो छोड चुके है
चाँद के दर पे जा पोहोचा है आज जमाना
नये जगत से हम भी नाता जोड चुके है
नया खून है नयी उमंगे अब है नयी जवानी
हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी

आज पुराण्या रूढीसाखळ्या आम्ही तोडल्या
कशास बघू त्या इमारती ज्या आम्ही सोडल्या
चंद्राच्या दारात पोहोचले विश्व आजचे
नव्या जगाशी नाते आम्ही जोडले आहे
नवे रक्त हे नव्या उमेदी यौवन नवीन लेवू
आम्ही लोक भारती आम्ही लोक भारती



हम को कितने ताजमहल है और बनाने
कितने ही अजंता हमको और सजाने
अभी पलटना है रुख कितने दर्याओं का
कितने पर्वत राहों से है आज मिटाने
नया खून है नयी उमंगे अब है नयी जवानी
हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी

कितिक ताजमहाल अजूनही घडवायाचे
कितिक अजिंठे अजून आम्हा सजवायाचे
कितिक अजूनही वळवायाचे जलौघ असती
कितिक पर्वतही वाटेतील हटवायाचे
नवे रक्त हे नव्या उमेदी यौवन नवीन लेवू
आम्ही लोक भारती आम्ही लोक भारती



आओ मेहनत को अपना ईमान बनाए
अपने हाथों को अपना अभिमान बनाए
राम की इस धरती को गौतम की भूमी को
सपनों से भी प्यारा हिंदोस्तान बनाए
नया खून है नयी उमंगे अब है नयी जवानी
हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी

कष्टांना अन्कर्मांना या सत्त्व करू या
आपल्या हातांचाही अन्अभिमान धरू या
रामजन्मभू आणखी गौतमी-मातृभूमीला
स्वप्नातील प्रिय हिदुस्थान चला करू या
नवे रक्त हे नव्या उमेदी यौवन नवीन लेवू
आम्ही लोक भारती आम्ही लोक भारती



हर जर्रा है मोती आँख उठाकर देखो
माटी मे सोना है हाथ बढाकर देखो
सोने की ये गंगा है चाँदी की यमुना
चाहो तो पत्थर पे घास उगाकर देखो
नया खून है नयी उमंगे अब है नयी जवानी
हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी

हर कण इथला मोती डोळे उघडून पाहा
माती इथली सोने हाती घेऊन पाहा
स्वर्णमयी ही गंगा चांदी यमुनामाई
चाहू तर पत्थरात ह्या गवतही उगवू
नवे रक्त हे नव्या उमेदी यौवन नवीन लेवू
आम्ही लोक भारती आम्ही लोक भारती

 

https://www.youtube.com/watch?v=ZJ71CWqgvdY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.