गीतानुवाद-२३६: एक तू ना मिला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२३६: एक तू ना मिला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-१२-१९

गीतानुवाद-२३६: एक तू ना मिला

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता
चित्रपटः हिमालय की गोद में, सालः १९६५, भूमिकाः मनोजकुमार, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२११२१९

 

धृ

एक तू ना मिला
सारी दुनिया मिले भी तो क्या है
मेरा दिल ना खिला
सारी बगिया खिले भी तो क्या है

मिळसी न तू
सारे जगही मिळून फायदा काय
बहरे ना हे मन
सारे उपवन बहरलेही तरी काय

धरती हूँ मैं और तू है गगन
होगा कहाँ तेरा मेरा मिलन
लाख पहेरे यहाँ
प्यार दिल में पले भी तो क्या हैं

मी धरती आहे आणि तू आहेस गगन
सांग होईल कुठे तुझे-माझे मिलन
लाख पहारे इथे
प्रेम रुजले मनातही तरी काय

तक़दीर की मैं कोई भूल हूँ
डाली से बिछड़ा हुआ फूल हूँ
साथ तेरा नहीं
संग दुनिया चले भी तो क्या है

कुठलीशी दैवाची मी चूक आहे
फांदीवरून खुडलेले फूल आहे
सोबत नाही तुझी
साथ जग चालले हे तरी काय

तुझसे लिपटकर जो रो लेते हम
आँसू नहीं थे ये मोती से कम
तेरा दामन नहीं
ये आँसू ढले भी तो क्या है

मी रडते गळ्यात घालुनी रे गळा
अश्रू ते मोतियांहून न मुळी कमी
तव आश्रयाविण
हे अश्रू ढळले तरी फायदा काय