२०२६-०८-१४

गीतानुवाद-३३८: दिल तेरा दीवाना है सनम

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः लता, रफी
चित्रपटः दिल तेरा दिवाना, सालः १९६२, भूमिकाः शम्मी कपूर, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०८१४


प्र

स्ता

बिजली गिराके आप ख़ुद
बिजली से डर गए
हम सादगी पे आपकी
लिल्लाह मर गए
हाय, हाय, हाय

वीज पाडून तू स्वतः
विजेलाच घाबरलीस
साधेपणावरती तुझ्या
साजणे जीवन वाहिले
हाय, हाय, हाय

धृ

दिल तेरा दीवाना है सनम
जानते हो तुम
कुछ ना कहेंगे हम
मोहब्बत की कसम
मोहब्बत की कसम

मन माझे खुळे आहे तुझे
जाणशी ते तू
काही ना म्हणेन मी
प्रेमाची शप्पथ
प्रेमाची शप्पथ

प्यार के अलबेले ये हमसफ़र
चल देंगे ले जाएगा दिल जिधर
राह में खो जाएँगे आज तो
मंज़िल कहाँ है हमें क्या ख़बर
कुछ चाहत का असर
कुछ मौसम का असर

प्रेमातील आगळे आम्ही सोबती
जाऊ घेऊन जाईल मन जिथे
आज तर हरवून जाऊ वाटेतच
गंतव्य आम्हाला ना माहिती
काहीसे आवडीने
काहीसे ऋतूमुळे

तेरी आँख मे जो सरूर है
सारा इसीका तो क़सूर है
सैयाँ अंजानी नगरी प्यार की
नादान यह दिल मेरा मजबूर है
जीवन मे एक बार
खुद हो जाता है प्यार

डोळ्यांत तुझ्या जे तेज आहे
चूक त्याचीच सारी आज आहे
पाहिलेली ना नगरी प्रीतीची
वेडे मन अगतिक आज आहे
जीवनात एकच वार
प्रीत होते ना स्वतःच

क्या कीजे कोई मन भा गया
दिल मे हमारे वह समा गया
हंस के किसी ने देखा एक बार
दिल की मुरादे कोई पा गया
सांसो मे मीठी आग
होठो पे मीठा राग

काय करू कुणी मनास भावले
मनात ते आले, रुजले, राहले
हसून पाहिले कुणी एकदाच
ईप्सिते मनची त्याला लाभली
श्वासांत गोडशी आग
ओठांवर खोटा राग

२०२६-०७-२३

गीतानुवाद-३३७: दिल तड़प तड़प के

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सलील चौधरी, गायकः मुकेश, लता
चित्रपटः मधुमती, सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७२२


धृ

दिल तड़प तड़प के कह रहा है
आ भी जा 
तू हमसे आँख ना चुरा
तुझे कसम है आ भी जा
तू नहीं तो ये बहार
क्या बहार है
गुल नहीं खिले तो तेरा इन्तज़ार है

तळमळून पुकारे मन हे, तू ये
ये तू ये
तू नजर टाळू नकोस
शपथ तुला तू ये
नसता तू, ही बहार ना
मुळि बहार असे
फूल उमलले न हे तुझीच वाट असे

दिल धड़क धड़क के
दे रहा है ये सदा
तुम्हारी हो चुकीं हूँ मैं
तुम्हारे साथ हूँ सदा
तुमसे मेरी ज़िन्दगी का ये श्रृंगार है
जी रही हूँ मैं के मुझको तुमसे प्यार है

हृदय धडधडून
हेच सांगते सदा
तुझीच झाले मी आता
तवसवे असे सदा
तुझ्यामुळेची जीवनाचे हे अलंकरण
प्रेमामुळेच लाभले जगण्यासहि कारण

मुस्कुराते प्यार का असर है हर कहीं
दिल कहाँ है हम किधर हैं
कुछ खबर नहीं
किधर है कुछ खबर नहीं

हसत्या या प्रेमाचा प्रभाव आहे सर्वदूर
मन कुठे आहे, मी कुठे आहे
काही माहित नाही
कुठे आहे काही माहित नाही

२०२६-०७-२०

गीतानुवाद-३३६: हर किसी को नहीं मिलता

मूळ हिंदी गीत: इंदिवर, संगीत: कल्याणजी आनंदजी, गायक: साधना सरगम, मनहर उधास
चित्रपट: जांबाज, सालः १९८६, भूमिकाः श्रीदेवी, अनिल कपूर, फिरोजखान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७२० 

धृ

हर किसी को नहीं मिलता
यहा प्यार जिंदगी में
खुशनसीब हैं वो जिनको हैं

मिली, ये बहार जिंदगी में

प्रत्येकासच ना मिळते
इथे, प्रेम जीवनी या
सुदैवी ते, ज्यांना मिळे
ही बहार जीवनी या

होठों से होंठ मिले ना भले

चाहे मिले ना बाहें बाहों से
दो दिल ज़िंदा रह सकते हैं

चाहत की भरी निगाहों से

ओठ ओठांना मिळो न सही
नसो हातातही ते हातही
दो मने जगू शकतात
आवडीच्या कटाक्षांनी

ज़ुल्फों के नर्म अंधेरें हैं

जिस्मों के गर्म उजाले हैं
जीते जी हम को प्यार मिला

हम दोनो किस्मतवाले हैं

कुंतलांचे मऊ अंधार आहेत
शरीरांचे उष्ण उजेड आहेत
हयातीत प्रीत मिळालेली
आहोत सुदैवी आम्ही दोघे

चाहे चांदी चमन मे बरसती रहे

खिलता नही फूल बहारबिना
है सचके बिना जीना मुमकिन

नामुमकिन जीना प्यारबिना

उपवनी बरसत असो चांदी
बहारीविना फुलते नच फूल
सत्याविण जगणे शक्य जरी
अशक्य जगणे प्रेमाविण आहे

२०२६-०७-१७

गीतानुवाद-३३५: किसी पत्थर की मूरत से

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायकः महेंद्र कपूर
चित्रपटः हमराज, सालः १९६७, भूमिकाः सुनील दत्त, विम्मी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७१७


धृ

किसी पत्थर की मूरत से
मुहब्बत का इरादा है
परस्तिश की तमन्ना है
इबादत का इरादा है

कुणा दगडाच्या मूर्तीवर
प्रेम करण्याची इच्छा आहे
अर्चना करण्याची इच्छा आहे
पुजा करण्याची मनीषा आहे

जो दिल की धड़कनें समझे
न आँखों की ज़ुबाँ समझे
नज़र की गुफ़्तगू समझे
न जज़बों का बयाँ समझे
उसी के सामने उसकी
शिक़ायत का इरादा है

जी न हृदस्पंद समजू शके
न जी नेत्रांची बोलीही समजे
गूज डोळ्यातील ना जाणे
न भावना काय ते जाणे
तिच्या समोरच तिच्या
तक्रारीची कांक्षा आहे

सुना है हर जवाँ पत्थर के
दिल में आग होती है
मगर जब तक न छेड़ो
शर्म के पर्दे में सोती है
ये सोचा है की दिल की
बात उसके रूबरू कह दे
नतीजा कुछ भी निकले
आज अपनी आरज़ू कह दे
हर इक बेजाँ तक़ल्लुफ़ से
बग़ावत का इरादा है

ऐकलेले युवा मूर्तीच्या
हृदयीही भावना फुलती
तरीही साद ना देता त्या
लाजेच्या पड्द्यातची राहती
केला विचार मी की गोष्ट
मनीची थेट सांगू तिला
पुढे मग काहीही होवो
मनोरथ सांगू या तिजला
हरेकच निष्प्राण ओळखीशी
लढा देण्याची मनीषा आहे

मुहब्बत बेरुख़ी से और
भड़केगी वो क्या जाने
तबीयत इस अदा पे और
फड़केगी वो क्या जाने
वो क्या जाने कि अपना
किस क़यामत का इरादा है

तुसडेपणाने प्रीत आणखीही
भडकेल ना समजे ती
चित्तही अशा लकबीने
आणखी चेतेल ना जाणे
काय माहीत तिला की
हेतू कसल्या प्रलयाचा आहे

स्तोत्रानुवाद-१२: वाचनप्रशंसा

(अनुष्टुप्‌ छंद)

संदर्भः 'आमोदः (सम्पूर्ण संस्कृतम्)’ या ८-वी ते १०-वी करताच्या पुस्तकातील एक पाठ

याचा संदर्भ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी जोडलेला आहे,  ज्यांचा वाढदिवस (१५ ऑक्टोबर) 'वाचनप्रेरणादिवस' म्हणून साजरा केला जातो. हे श्लोक सांगतात की वाचनाने चारित्र्य, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह कसे विकसित होतात.

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७१७


शीलं सद्गुण सम्पत्तिः
ज्ञानं विज्ञानमेवच
उत्साहो वर्धते येन
वाचनं तद् हितावहम्

शील, सद्गुण, संपत्ती
ज्ञानविज्ञान आणिक
उत्साह वाढतो ज्याने
वाचणे ते हितावह

मनुजा वाचनेनैव
बोधन्ते विषयान् बहून्
दक्षा भवन्ति कार्येषु
वाचनेन बहुश्रुताः

माणसा वाचनानेच
ज्ञानवैविध्य जाणवे
कामात दक्ष तो होई
वाचल्याने, बहुश्रुत

वाल्मिकी व्यास बाणाद्याः
प्राचीनः कविपन्डिताः
तान् शिक्षयन्ति सततं
ये सदा वाचने रताः

वाल्मिकी, व्यास, बाणादी
पुराणे काव्यपंडित
शिकवती सदा हेच
वाचनात व्हावे रत

अद्ययावद्धि ज्ञानाय
वृत्तपत्रं पठेत्सदा
सर्वविधसुविद्यार्थं
वाचनमुपकारकम्

अद्ययावत ज्ञानार्थ
वाचावे वृत्तपत्र ते
बहुविध विद्यांसाठी
वाचणे उपकारक

वृथाभ्रमणकुक्रीडा
परपीडापभाषणैः
कालक्षेपो न कर्तव्यो
विद्यार्थी वाचनं श्रयेत्

हिंडणे खेळणे व्यर्थ
त्रास देणे नि निंदणे
वेळ घालवणे टाळा
विद्यार्थ्यां श्रेय वाचणे

वाचनं ज्ञानदं बाल्ये
तारुण्ये शीलरक्षकम्
वार्धक्ये दुःखहरणं
हितं सद् ग्रंथवाचनम्

वाचने बोध हो बाल्ये
यौवने शीलरक्षण
वृद्धत्वी दुःख हरणे
साधे सद्ग्रंथवाचने

२०२६-०७-१६

गीतानुवाद-३३४: जाने क्या तूने कही

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः गीता दत्त
चित्रपटः प्यासा, सालः १९५७, भूमिकाः वहिदा रेहमान, गुरू दत्त 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५११२३


धृ

जाने क्या तूने कही
जाने क्या मैने सुनी
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही

काय म्हटलेस तू रे
ऐकले काय मी ते
गूज जुळले बघ सारे
काय म्हटलेस तू रे

सनसनाहट सी हुई
थरथराहट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी

खळबळ अंतरी झाली
थरथरत जाण गेली
स्वप्ने किती जागली
गूज जुळले बघ सारे

नैन झुक झुक के उठे
पाँव रुक रुक के उठे
आ गयी जान नई
बात कुछ बन ही गयी

नेत्र झुकूनिया उठले
पाय थबकतच गेले
आले चैतन्य नवे
गूज जुळले बघ सारे

ज़ुल्फ़ शाने पे मुड़े
एक खुशबू सी उड़े
खुल गये राज़ कई
बात कुछ बन ही गयी

केश स्कंधी वळले
गंध वार्‍यावर उडे
खुली झाली गुपिते
गूज जुळले बघ सारे

 

२०२६-०७-१३

गीतानुवाद-३३३: जिसके लिए तड़पे हम

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः रफी, आशा
चित्रपटः साँझ और सवेरा, सालः १९६४, भूमिकाः मीना कुमारी, गुरु दत्त 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०२०२


धृ

जिसके लिए तड़पे हम
सारा जीवन भर
यही है वो साँझ और सवेरा
जिसके लिए तड़पे हम
सारा जीवन भर
यही है वो साँझ और सवेरा

र:


आ:

ज्याकरता झुरलो आम्ही
सारे जीवनभर
हीच ती पहाट आणि संध्या
ज्याकरता झुरलो आम्ही
सारे जीवनभर
हीच ती पहाट आणि संध्या

जनम-जनम से अँधेरा था मेरी राहों में
ये बात कब थी भला
मदभरी फ़िज़ाओं में
सबा बहार के डोले में तुमको लाई है
के आज सारी ख़ुदाई है मेरी बाँहों में
चला गया ग़म का वो अन्धेरा
मिलन हुआ प्यार का सुनहरा

र:

 

जन्म जन्म अंधार मम पथी होता
मदमस्त बहारीतही
असे कधी होते
पहाटवार्‍याने डोलीत तुला आणले आहे
आज स्वर्गच माझ्या मिठीत आहे
निघुन गेला आहे सर्व अंधारही तो
मिलन झाले आहे सोनेरी हे प्रीतीचे

तुम्हीं छुपे थे मेरी
 ज़िन्दगी के दर्पण में
तुम्हारा प्यार समेटा है
 अपने दामन में
जले हैं प्यार के दीपक
बना धुआँ काजल
खिले हैं फूल तमन्ना के
दिल के आँगन में
मिला मुझे साथ संग तेरा
चमक उठा अब नसीब तेरा

आ:

 

 

तूच दडला आहेस
दर्पणी आयुष्याच्या
तुझीच प्रीत मी
घेतली भरून ओटीत
उजळले प्रेमदीप
धूरही काजळ झाला
इच्छेचे फूल बहरले
मनातही माझ्या
मिळाली साथ सोबतीस तुझी
उजळले आहे हे नशीब माझे

मेरी पलक पे तुम्हारी पलक
 का साया है
ज़बान-ए-दिल पे
तुम्हारा ही नाम आया है
निसार ऐसी ख़ुशी पर
हमारी सारी उमर
के हमने चाँद को
अपने गले लगाया है
तुमने रंग प्यार का भरा गहरा
निखर गया आसमाँ का चेहरा

र:

पापणीवर तुझ्या पापणीची
छाया आहे
मनाच्या वाचेवरती
नावही तुझेच आहे
अशा खुशीवरती
ओवाळले जीवन सारे
चंद्र जणू माझीया
कवेत आला आहे
रंग गहरा भरलास जीवनीही तू
रंग आकाशाचाही उजळला आहे

२०२६-०७-०२

गीतानुवाद-३३२: तू प्यार का सागर है

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मन्ना डे
चित्रपटः सीमा, सालः १९५५, भूमिकाः नूतन, बलराज साहनी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०९२३

धृ

तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने
चले जायेंगे जहां से हम

तू प्रेमाचा सागर अन्‌
तुझ्या थेंबास तहानलो मी
परतवशी जरी का तू
हे जग जाईन सोडुनी मी

घायल मन का पागल पंछी
उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली
जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा
राह भूले थे कहाँ से हम

जखमी मनाचा, वेडा पक्षी
उडण्यासाठी अधीर
पंखही कोमल, भरले डोळे
जाणे आहे पैलतीरी
आता तूच याला समजाव
चुकलो पथ कुठुनी आम्ही

इधर झूम के गाये ज़िंदगी
उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा
उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे
कि आएँ कौन दिशा से हम

इथे नाचते, गाते हे जीवन
तिथे आहे मृत्यू परी
कुणास ठाऊक कुठे ही सीमा
अडचण हीच उभी
कानात जरा तू सांग
की येऊ दिशेनि कुठल्या मी

२०२६-०६-३०

गीतानुवाद-३३१: मिलो न तुम तो हम घबराये

मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः मदन मोहन, गायकः लता
चित्रपटः हीर-रांझा, सालः १९७०, भूमिकाः प्रिया राजवंश, राजकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२४०७०२


धृ

मिलो न तुम तो हम घबराये
मिलो तो आँख चुराये
हमें क्या हो गया है
तुम्हीं को दिल का राज़ बतायें
तुम्हीं से राज़ छुपायें
हमें क्या हो गया है

न भेटशी तर जीव घाबरे
भेटता नजरा चुकवे
मला झाले तरी काय
रहस्य मनिचे तुला सांगते
गूज तुलाच न सांगे
मला झाले तरी काय

ओ भोले साथिया
देखे जो शोखी तेरे प्यार की
आँचल में भर ली हमने
सारी बहारें संसार की
नयी अदा से हम इठलायें
पायी खुशी लुटायें
हमें क्या हो गया है

रे भोळ्या साजणा
नादही पाहून तुझ्या प्रेमाचा
पदरी घेतली भरून मी
सारी बहारच या जगातली
नवा भाव घेऊन हरखले
उधळे खुशी मिळाली
मला झाले तरी काय

रूठे कभी कभी मान गये
बातें तुम्हारी हम जान गये
ऐसी अदायें क़ुरबान गये
तुम्हें मनाये दिल बहलायें
क्या क्या नाज़ उठायें
हमें क्या हो गया है

कधी रुसले कधी जरी मानले
म्हणणे सारे तुझे जाणले
प्रसन्न हरकतींवर मी झाले
रुसवा काढे मना रंजवे
काय काय न करे
मला झाले तरी काय

ओ सोहने जोगिया
रंग ले हमें भी इसी रंग में
फिर से सुना दे बंसी
कलियाँ खिला दे गोरे अंग में
वही जो तानें आग लगाये
उन्हीं से आग बुझाएं
हमें क्या हो गया है

ओ स्वर्णकेशरा
रंगव मलाही या रंगाने
पुन्हा ऐकव बांसरी
कळ्या खुलव तू गोर्‍या अंगी रे
तीच तान जी पेटवी वणवा
तिनेच विझवू कसा रे
मला झाले तरी काय

२०२६-०६-१६

गीतानुवाद-३३०: छुप गया कोई रे

मूळ हिंदी गीतः राजिंदर कृष्ण, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः चंपाकली, सालः १९५७, भूमिकाः सुचित्रा सेन, भारत भूषण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०६१६


धृ

छुप गया कोई रे दूर से पुकार के
दर्द अनोखे हाय दे गया प्यार के

लपला का कोणी रे दुरून पुकारून रे
दुःख अनोखे हे देऊन गेला प्रीतीचे

आज हैं सूनी सूनी दिल की ये गलियाँ
बन गई काँटे मेरी खुशियों की कलियाँ
प्यार भी खोया मैने सब कुछ हार के
दर्द अनोखे हाय दे गया प्यार के

आज सूनसान आहेत मनाचे हे मार्ग रे
आनंदाचेही माझ्या झाले रे काटे हे
प्रीतही गमावली मी सर्वस्व हारून रे
दुःख अनोखे हे देऊन गेला प्रीतीचे

अँखियों से नींद गई मनवा से चैन रे
छुप छुप रोए मेरे खोए खोए नैन रे
हाय यही तो मेरे दिन थे सिंगार के
दर्द अनोखे हाय दे गया प्यार के

डोळ्यांतून झोप गेली मनाचेही सौख्य रे
गुपचुप क्रंदती माझे हरवले नेत्र रे
हेच तर होते माझे दिस श्रुंगाराचे रे
दुःख अनोखे हे देऊन गेला प्रीतीचे