२०२०-०९-०८

गीतानुवाद-१६०: ये मौसम रंगीन समा

मूल हिंदी गीतः गुलशन बावरा, संगीतः रवी, गायकः सुमन कल्याणपूर, मुकेश
चित्रपटः मॉडर्न गर्ल, सालः १९६१, भूमिकाः प्रदीपकुमार, सईदा खान, स्मृती बिस्वास 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५१९ बुद्धपौर्णिमा


धृ

ये मौसम रंगीन समा
ठहर ज़रा जान--जां
तेरा मेरा मेरा तेरा प्यार है
तो फिर कैसा शरमाना

मुः

हा मौसम रंगीन ऋतू
थांब जरा मम प्राणच तू
तुझे माझे माझे तुझे प्रेम आहे
तर का उगाच लाजावे

 

रुक तो मैं जाऊँ जान--जां
मुझको है इनकार कहाँ
तेरा मेरा मेरा तेरा प्यार सनम
बन जाए अफ़साना

सु:

थांबेन मी ही प्राणसख्या
माझीही मुळीच नाही ना
तुझे माझे माझे तुझे प्रेम खरे
पण होवो त्याची गाथा



ये चाँद ये सितारे
कहते हैं मिल के सारे
आजा प्यार करें

मु:

 

हा चंद्र आणि हे तारे
म्हणती मिळून सारे
ये प्रेम करू

 

ये चाँद बैरी देखे
ऐसे में बोलो कैसे
इक़रार करें

सु:

 

हा चंद्र कसा मज बघतो
मग सांग कशी मी देऊ
रे होकार तुला

 

दिल में है कुछ कुछ कहे ज़ुबां
प्यार यही है जान--जां

मु:

 

मनात एक, बोलच दुसरे
प्रेम हेच प्राणप्रिये



ये प्यार की लम्बी राहें
बाहों में डाले बाहें
कहीं दूर चलें

मु:

प्रेमाच्या लांबच वाटा
हातात घेऊनी हाता
कुठे दूर चलू

 

बैठे हैं घेरा डाले
ये ज़ालिम दुनिया वाले
हमें देख जले

सु:

 

हे कर्मठ दुनियावाले
वेढून बसलेले सारे
पहा जळतात कसे

 

जलता है तो जले जहाँ
ठहर ज़रा जान--जां

मु:

जळते तर जळू दे दुनिया
थांब जरा मम प्राणच तू

 

https://www.youtube.com/watch?v=g2XjxDdYp8Y

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.