मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपटः तिसरी कसम, सालः १९६६, भूमिकाः राज कपूर
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१००१
धृ
|
सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है न हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है
|
राजसा खोटे बोलू नको ईश्वरापाशी जायाचे तिथे हत्ती न घोडा असे तिथे पायीच जायाचे
|
१
|
तुम्हारे महल चौबारे यहीं रह जाएंगे सारे अकड़ किस बात कि प्यारे ये सर फिर भी झुकाना है
|
तुमचे ते महाल अन् वाडे जगीच ह्या राहतील सारे गर्व कसला तुला बारे हे शिर तरीही झुकायाचे
|
२
|
भला कीजै भला होगा बुरा कीजै बुरा होगा बही लिख लिख के क्या होगा यहीं सब कुछ चुकाना है
|
बरे केल्यास बरे होईल बुरे केल्यास बुरे होईल लिहून तेच तेच काय होईल इथेच सारे चुकवायाचे
|
३
|
लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया वही किस्सा पुराना है
|
खेळांमध्ये बाल्य गेले यौवन झोपेमध्ये सरले जरा पाहून रडू आले हा किस्सा जुनाच आहे
|
https://www.youtube.com/watch?v=IhUBBkXAu9M
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.