गीतानुवाद-१५६: बेकरार करके हमे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१५६: बेकरार करके हमे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२०-०९-०५

गीतानुवाद-१५६: बेकरार करके हमे

मूळ हिंदी गीतः शकिल बदायुनी, संगीतः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिकाः वहिदा रेहमान, विश्वजीत 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००९०५

॥
धृ
॥

बेकरार करके हमे यूँ न जाईये
आपको हमारी कसम लौट आईये

अधीर करून नकोस अशी जाऊ तू
तुला माझी शपथ सये परतून ये

॥
१
॥

देखिये वो काली काली बदलियाँ
जुल्फ की घटा चुरा न ले कही
चोरी चोरी आके शोख बिजलियाँ
आपकी अदा चुरा न ले कही
यूँ कदम अकेले न आगे बढाईये

ते पहा ते काळेकुट्ट ढग जणू
चोरती केसांतुनी तव काजळी
येउनी लपतछपत सौदामिनी
नेती बघ तुझ्या कळा हरूनही
एकटीच नको अशी जाऊ पुढे

॥
२
॥

देखिये गुलाब की वो डालियाँ
बढके चूम ले न आपके कदम
खोये खोये भँवरे भी है बाग में
कोई आपको बना न ले सनम
बहकी बहकी नजरों से
खुदको बचाईये

त्या पहा गुलाबाच्या डिक्षा कशा
झुकुनी पावले तुझी का चुंबती
गुंगले भुंगेही फिरती उपवनी
कुणी तुला करो सये न आपलीशी
इकड तिकडच्या नजरांतुनी
वाचव स्वतःस तू

॥
३
॥

जिंदगी के रास्ते अजीब है
इनमें इस तरह चला न किजिये
खैर है इसी मे आपकी हुजूर
अपना कोई साथी ढुंढ लिजिये
दिलसे दिलकी बात
यूँ न मुस्कुराईये

जीवनाचे मार्ग हे अजब असे
ह्यांवरून असे नको चालूस तू
ह्यातची तुझे भले आहे सखे
कोणी सोबती हुडक स्वतःस तू
मनामनाचे गूज, असे
नकोस स्मित करू


https://www.dailymotion.com/video/x2cs7p6