२०२०-०८-३०

गीतानुवाद-१५१: रहें ना रहें हम

मूळ हिंदी गीतकारः मजरूह, संगीतः रोशन, गायकः रफी, सुमन कल्याणपूर
चित्रपटः ममता, सालः १९६६, भूमिकाः सुचित्रा सेन, अशोक कुमार, धर्मेंद्र

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७१२०२ 

धृ

रहें ना रहें हम, महका करेंगे
बन के कलीबन के सबा
बाग़े वफ़ा में

असू ना असू पण, दरवळत राहू
होऊन कळी, लेवून बहर
प्रीत उपवनी

मौसम कोई हो इस चमन में
रंग बनके रहेंगे इन फ़िज़ा में
चाहत की खुशबू, यूँ ही ज़ुल्फ़ों
से उड़ेगी, खिज़ा हो या बहारें
यूँही झूमते, युहीँ झूमते
और, खिलते रहेंगे

कुठलाही ऋतू हो, उपवनी ह्या
रंग होऊन वसू या, ह्या बहारीत
ओढीचा दरवळ, स्वैर पसरेल
केसांतून या, या बहारीत, एरव्हीही
असे बागडूया, असे बागडूया
आणखी फुलूया

खोये हम ऐसे क्या है मिलना
क्या बिछड़ना नहीं है, याद हमको
गुंचे में दिल के जब से आये
सिर्फ़ दिल की ज़मीं है, याद हमको
इसी सरज़मीं, इसी सरज़मीं पे
हम तो रहेंगे

हरवलो असे की, काय भेटही
अन् विरह काय, हे न ठाऊक
परिघी मनाच्या आल्यापासून
रंगभूमी  मनाची  फक्त ठाऊक
या रंगभूवर, या रंगभूवर
अभिव्यक्त होऊ

जब हम न होंगे तब हमारी
खाक पे तुम रुकोगे चलते चलते
अश्कों से भीगी चांदनी में
इक सदा सी सुनोगे चलते चलते
वहीं पे कहीं, वहीं पे कहीं
हम, तुमसे मिलेंगे

राहिन न मी, तू तेव्हा माझ्या
ये चिर्‍याशी फिरता फिरता
अश्रुंत भिजल्या चांदण्यातून
साद श्रवशील फिरता फिरता
कुठेशी तिथे, कुठेशी तिथे
भेटेन तुज मी

सुमन:
है खूबसूरत ये नज़ारे
ये बहारें हमारे दम-क़दम से
रफ़ी:
ज़िंदा हुई है फिर जहाँ में
आज इश्क़-ओ-वफ़ा की रस्म हम से
दोनों:
यूँही इस चमन
यूँही इस चमन की ज़ीनत रहेंगे

सुमन:
खुलताती सुंदर देखावे हे
हे बहरही, आपल्या वावराने
रफ़ी:
आपल्यामुळेची पुनर्जीवित
प्रथा आहे प्रेमालापाची
दोघे:
उपवनी इथे ह्या
उपवनी इथे ह्या तळपतच राहू

https://www.youtube.com/watch?v=33bc3ReYKh0

गीतानुवाद-१५०: मेरा दिल ये पुकारे आ जा

मूळ हिंदी गीतकार: राजेंद्र कृष्ण, संगीत: हेमंतकुमार, गायीका: लता
चित्रपट: नागिन, साल: १९५४, भूमिका: वैजयंतीमाला, प्रदीपकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२२२



धृ

मेरा दिल ये पुकारे आ जा
मेरे ग़म के सहारे आ जा
भीगा भीगा है समा, ऐसे में है तू कहाँ
मेरा दिल ये पुकारे आजा

माझे मन हे पुकारे राजा
दु:खसोबत्या माझ्या येऊन जा
सर्द सर्द ही हवा, मला ठाव तुझा वा
माझे मन हे पुकारे राजा



तू नहीं तो ये रुत
ये हवा क्या करूँ, क्या करूँ
तू नहीं तो ये रुत, ये हवा क्या करूँ
दूर तुझ से मैं रह के
बता क्या करूँ, क्या करूँ
सूना सूना है जहाँ, अब जाऊँ मैं कहाँ
बस इतना मुझे समझा जा

तू नाही तर हा ऋतू
ही हवा काय करू, काय करू
तू नाही तर हा ऋतू, ही हवा काय करू
तुझ्या पासून दूर
राहूनी काय करू, काय करू
वाटे खूप एकटे, आता जाऊ सांग कुठे
फक्त एवढे मला सांगून जा



आँधियाँ वो चलीं
आशियां लुट गया, लुट गया
आँधियाँ वो चलीं, आशियां लुट गया
प्यार का मुस्कुराता
जहाँ लुट गया, लुट गया
एक छोटी सी झलक
मेरे मिटने तलक
ओ चाँद मेरे दिखला जा

वादळे ही आली
ध्वस्त जग जाहले, जाहले
वादळे ही आली ध्वस्त जग जाहले
हासर्‍या प्रीतीचे
जगच संपले, संपले
मी मिटे तोपर्यंत
अल्पशी तव झलक
हे चंद्रा माझ्या देऊन जा



मुँह छुपा के मेरी
ज़िंदगी रो रही, रो रही
दिन ढला भी नहीं
शाम क्यों हो रही, हो रही
तेरी दुनिया से हम
ले के चले तेरा ग़म
दम भर के लिये तो आ जा

तोंड लपवून माझे
जीवनच रडतसे, रडतसे
दिवस ढळला न तरी
सांज का होतसे, होतसे
तुझ्या दुनियेतून मी
निघते दु:ख घेऊनी
क्षणभरच तरी येऊन जा

 

https://www.youtube.com/watch?v=mr_n9R3E_w4

२०२०-०८-२९

गीतानुवाद-१४९: न तुम हमें जानो

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतकारः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार, सुमन कल्याणपुर
चित्रपटः बात एक रात की, सालः १९६२, भूमिकाः देव आनंद, वहिदा रहमान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००५०३

धृ

न तुम हमें जानो
न हम तुम्हे जानें
मगर लगता है कुछ ऐसा
मेरा हमदम मिल गया

न ओळखसी तू मला
न मीही ओळखत तुला
तरी वाटे जणू ऐसे
मला सहचर लाभला

ये मौसम ये रात चुप है
ये होंठों की बात चुप है
खामोशी सुनाने लगी, है दास्तां
नज़र बन गई है, दिल की ज़ुबां

हा ऋतूही न रात्र बोले
अधरही अबोल झाले
निरवताच सांगे, सारी कथा
नजर वैखरीच झाली माझी आता

मुहब्बत के मोड़ पे हम
मिले सबको छोड़ के हम
धड़कते दिलों का लेके, ये कारवां
चले आज दोनो, जाने कहाँ

प्रीतीच्या वळणावरी ज्या
भेटलो त्यजून जगा ह्या
स्पंदत्या मनांचा घेऊन हा काफिला
निघालो कुठे न जाणे, दोघे आता

 

https://www.youtube.com/watch?v=h_kFBR6V5gc

गीतानुवाद-१४८: मेरे महबूब क़यामत होगी

 मूळ हिंदी गीत: आनंद बक्षी, संगीत: लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायक: किशोरकुमार
चित्रपट: मिस्टर एक्स इन बॉम्बे, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, कुमकुम, मदन पुरी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०११५


धृ

मेरे महबूब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
नाम निकलेगा तेराही लब से
जान जब इस दिले नाकाम से
रुखसत होगी, मेरे महबूब

प्रिये माझे प्रलयची होईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
नाव ओठावरती तुझेच येईल
प्राण जव ह्या परास्त देहातून
रवाना होतील, प्रिये माझे



मेरे सनम के दर पे अगर
बाद ए सबा हो तेरा गुजर
कहना सितमगर कुछ है खबर
तेरा नाम लिया जब तक भी जिया
ए शमा तेरा परवाना
जिसे अबतक तुझे नफरत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
मेरे महबूब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
मेरे महबूब

माझ्या प्रियेच्या दारी जरी
पहाटवार्‍या जाशील तू
सांग निर्ममे, एक वार्ता आहे
नाव तुझेच घेतले, जोवर जगलो
ए ज्योती, मी पतंग तुझा
ज्याविषयी आजवर तुला चीडच येईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
प्रिये माझे प्रलयची होईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
प्रिये माझे



मेरे महबूब क़यामत होगी
आज रुसवा तेरी गलियों में मुहब्बत होगी
मेरी नजरे तो गिला करती है
तेरे दिल को भी सनम
तुझसे शिकायत होगी
मेरे महबूब

प्रिये माझे प्रलयची होईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
आहेच नजरेत गार्‍हाणे माझ्या
तुझ्या मनालाही प्रिये
तुझी तक्रारच असेल
प्रिये माझे


तेरी गली मैं आता सनम
नग़मा वफ़ा का गाता सनम
तुझ से सुना ना जाता सनम
फिर आज इधर आया हूँ मगर
ये कहने मैं दीवाना
ख़त्म बस आज ये वहशत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
मेरे महबूब

तुझ्या गल्लीत मी येईन प्रिये
निष्ठेचे गाणे गाईन प्रिये
ऐकवेल तुज ते ना प्रिये
मग आज इथे, आलो मी पुन्हा
सांगण्या हे, मी खुळा
की उत्सुकता आज ही संपेल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
प्रिये माझे



मेरी तरह तू आहे भरे
तू भी किसीसे प्यार करे
और रहे वो तुझसे परे
तुने, ओ सनम, ढाये है सितम
तो ये तू भूल न जाना
के तुझपे भी इनायत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
मेरे महबूब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी
मेरी नजरे तो गिला करती है
तेरे दिल को भी सनम
तुझसे शिकायत होगी, मेरे महबूब
मेरे महबूब

निश्वास तू मजपरी भरावे
तू पण कुणावर प्रेम करावे
त्याने तुला टाळून रहावे
प्रिये, केले तू अपराध आहेस
तर तू हे मुळीच नको विसरू
त्यांचीही दया, तुवर होईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
प्रिये माझे प्रलयची होईल
आज बदनाम, तव ल्ली प्रीती होईल
आहेच नजरेत गार्‍हाणे माझ्या
तुझ्या मनालाही प्रिये
तुझी तक्रारच असेल
प्रिये माझे

 

https://www.youtube.com/watch?v=IuZd1y2UMbI

२०२०-०८-२७

गीतानुवाद-१४७: सब कुछ सिखा हमने

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश
चित्रपटः अनाडी, सालः १९५९, भूमिकाः राजकपूर, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२५ 


धृ

सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

सगळंच शिकलो जरी मी, शिकली चतुराई
खरं तर जगवाल्यांनो, मी आहे अडाणी



दुनिया ने कितना समझाया
कौन है अपना, कौन पराया
फिर भी दिल की चोट छुपाकर
हमने आपका दिल बहलाया
खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

दुनियेने ह्या किती समजावले
कोण आपले ते, कोण ते परके
लपवून तरीही घाव हृदीचे
तुजसी मी नेहमीच रिझविले
स्वतः वाहून घेण्याची, जिद्दच होती माझी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी



असली नकली चेहरे देखे
दिल पे सौ सौ पहरे देखे
मेरे दुखते दिल से पुछो
क्या क्या ख्वाब सुनहरे देखे
टूटा जिस तारे पे नजर थी हमारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

असली नकली चेहरे दिसले
हृदयी पहारे शंभर दिसले
दुखर्या मम हृदयास विचारा
सोनेरी किती दिसली स्वप्ने
तुटला तो तारा, जो अवलोकी होतो मी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी



दिल का चमन उजडते देखा
प्यार का रंग उतरते देखा
हमने हर जीने वाले को
धन दौलत पे मरते देखा
दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

भग्न हृदय होतांना दिसले
प्रेमरंग उडतांना दिसले
जगणारे सारेची मजला
दौलतीवर जिव टाकत दिसले
जिवास जिव देणारे, परि मरती भिकारी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी

 https://www.youtube.com/watch?v=OLZoBJxlQBA

२०२०-०८-२०

गीतानुवाद-१४६: न ये चाँद होगा न तारें रहेंगे

गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: हेमंत कुमार, गायक: हेमंत कुमार, गीता दत्त
चित्रपट: शर्त, सालः १९५४, भूमिकाः शामा, दीपक, शशीकला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०७२२


धृ

न ये चाँद होगा, न तारे रहेंगे
मगर हम हमेशा, तुम्हारे रहेंगे

 

न हा चंद्र राहील, त्या तारकाही
तरी होउनी मी, तुझा नित्य राहीन



बिछड़कर चले जाए तुम से कहीं
तो ये ना समझना मोहब्बत नहीं
जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे

जरी तवविना वेगळा जाहलो मी
तु समजू नको की मला प्रीत नाही
कुठेही असो मी, तुझा नित्य राहीन



जमाना अगर कुछ कहे भी तो क्या
मगर तुम न कहना हमें बेवफा
तुम्हारे लिये हैं, तुम्हारे रहेंगे

जगाने जरी बोलले काहिही तरि
नको तू कृतघ्न म्हणू मज कधीही
तुझाची असे मी, तुझा नित्य राहीन



ये होगा सितम हमने पहले ना जाना
बना भी ना था, जल गया आशियाना
कहा अब मोहब्बत के मारे रहेंगे

अपराध होईल आधी न कळले
वसले न घर ते जळून खाक झाले
कुठे राहु आता, आम्ही प्रेमवेडे  



नज़र ढूँढती थी जिसे पा लिया है
उम्मीदों के फूलों से दामन भरा है
ये दिन हमको सब दिन से प्यारे रहेंगे

जया शोधले मी तया पावले रे
असे पूर्ण आशेनि मन भारलेले
असे दीस हे नेहमी प्रीय होतील



कहूँ क्या मेरे दिल का अर्मान क्या है
तुम्हें हर घड़ी चूमना चाहता है
कहाँ तक भला जी को मारे रहेंगे

कसे सांगु माझे मनी काय आहे
तुला सारखे चुंबु मज वाटते रे
कधी पावतो राहु मन मारुनी ते



सहारा मिले जो तुम्हारी हँसी का
भुला देंगे हम सारा ग़म ज़िन्दगी का
तुम्हारे लिये हैं तुम्हारे रहेंगे

मिळे सोबतीला, तुझे हास्य ते जर
तरी दुःख सारे, न राहील पळभर
तुझीची असे मी, तुझी नित्य राहीन

https://www.youtube.com/watch?v=4embLJ-pTRE

 

२०२०-०८-१७

गीतानुवाद-१४५: जब चली ठण्डी हवा

 मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायक: आशा
चित्रपटः दो बदन, सालः १९६६, भूमिकाः आशा पारेख, मनोज कुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१५ 


धृ

जब चली ठण्डी हवा
जब उठी काली घटा
मुझको जान--वफ़ा
तुम याद आए

झुळुक येता गार गार
स्वच्छ होता नभ अपार
जिवलगा माझ्या मला
तुझी याद आली



ज़िंदगी की दास्तां
चाहे कितनी हो हंसीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
क्या मज़ा आता सनम
आज भूलेसे कहीं
तुम भी आजाते यहीं
तुम भी आजाते यहीं
ये बहारें ये फ़िज़ा
देखकर दिलरुबा
जाने क्या दिल को हुआ
तुम याद आये

जीवनाची ही कथा
सुरस किती असली तरी
तुजविना पण व्यर्थ ही
तुजविना पण व्यर्थ ही
किती मजा येईल बघ
जर चुकुन येशी इथे
तू ही येशील जर इथे
तू ही येशील जर इथे
ही बहार अन् हा ऋतू
पाहूनी हे साजणा
काय झाले ना कळे
तुझी याद आली



ये नज़ारे ये समा
और फिर इतने जवाँ
हाये रे ये मस्तियाँ
हाये रे ये मस्तियाँ
ऐसा लगता हैं मुझे
जैसे तुम नज़दीक हो
इस चमन से जान--जां
इस चमन से जान--जां
सुन के प्रीतिकी सदा
दिल धड़कता हैं मेरा
आज पहलेसे सिवा
तुम याद आए

देखावे रंगतही ही
सारे हे इतके युवा
हाय रे धुंदीत या
हाय रे धुंदीत या
ऐसे वाटे रे मला
जवळी तू असशी जणू
जिवलगा ह्या उपवनी
जिवलगा ह्या उपवनी
ऐकूनी प्रीतीगुजा
मन माझे स्पंदे इथे
आधीपासूनच आणि
तुझी याद आली