गीतानुवाद-२३९: आजा रे मेरे प्यार के राही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२३९: आजा रे मेरे प्यार के राही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०३-१८

गीतानुवाद-२३९: आजा रे मेरे प्यार के राही

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः चित्रगुप्त, गायिकाः लता, महेंद्र कपूर
चित्रपटः उँचे लोग, सालः १९६५, भूमिकाः अशोक कुमार, राजकुमार, फिरोझखान, विजया, कन्हयालाल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०७२७

धृ

आजा रे मेरे प्यार के राही
राह निहारूँ बड़ी देर से

राजा रे माझ्या प्रेमपथिका
वाट पाहते कधीचीच मी

जो चाँद बुलाए, मैं तो नहीं बोलूँ
जो सूरज आए, आँख नहीं खोलूँ
मूँद के नैना मैं तिहारी
राह निहारूँ बड़ी देर से

जर चंद्र पुकारेल, तर बोलणार नाही
जर सूर्य उगवला, तर पाहणार नाही
डोळे मिटूनच मी रे तुझी
वाट पहाते कधीचीच मी

कहाँ है बसा दे तन की ख़ुशबू से
घटा से मैं खेलूँ ज़ुल्फ़ तेरी छूके
रूप का तेरे मैं पुजारी
राह निहारूँ बड़ी देर से
आजा रे मेरे प्यार के राही
राह निहारूँ बड़ी देर से

कुठे आहेस, वसव रे, तनू सुगंधाने
मी रजनीशी खेळू, कुंतल स्पर्शाने
तुझ्या मी रूपाचा पुजारी
वाट पहातो कधीचाच मी
राणी ग माझे प्रेमपथिके
वाट पाहतो कधीचाच मी

कहीँ भी रहूँगी मैं हूँ तेरी छाया
तुझे मैंने पाके फिर भी नहीं पाया
देख मैं तेरी प्रीत की मारी
राह निहारूँ बड़ी देर से

कुठेही असो मी, तुझीच मी छाया
मिळून मला तू, न लाभलीस प्रिया
तहानले प्रीतीस, तुझ्या मी
वाट पहाते कधीचीच मी